दानोळीतील ट्रॅक्टर ड्रायव्हर च्या हलगर्जी पणामुळे एक जागीच ठार.
दानोळीतील ट्रॅक्टर ड्रायव्हर च्या हलगर्जी पणामुळे एक जागीच ठार.
----------------------------
जयसिंगपुर प्रतिनिधी
राहुल कांबळे
-----------------------------
दानोळी तालुका शिरोळ मध्ये ट्रॅक्टर व मोकळी डंपिंग ट्रॉली मोकळ्या जागेत मागील परिस्थिती न बघता निष्काळजी पणाने पाठीमागे घेत असताना एकास धडक दील्याने जागीच ठार झाला असल्याची घटना दानोळी येथे घडली आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातुन मिळालेली अधिक माहिती अशी की सोमवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास यातील संशयित आरोपी बाळासो गावडे हे आपल्या ताब्यातील नंबर प्लेट नसलेली ट्रॅक्टर व डम्पिंग ट्रॉली मोकळ्या जागेमध्ये रिव्हर्स घेत असताना पाठीमागे न पाहता व परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काजीपणाने ट्रॅक्टर मागे घेऊन ट्रॉलीच्या मागे उभे असलेल्या मयत बाजीराव जाधव याच्या अंगावर ट्रॉली गेल्यामुळे त्यांच्या पायाचे व कमरेचे हाडे मोडून तसेच मांडीवरून चाक गेल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून घटनेतील चालक गावडे हे बाजीराव जाधव यांच्यावर औषध उपचार न करता व अपघाताची वर्दी न देता घटनास्थळावरून पळून गेला आहे या .संशयित आरोपी बाळासो गावडे फरारी असून त्याच्यावर भा.द.वि.स कलम 304 ( अ ),279,337, 338 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा प्रथम खबरी अहवाल मे न्यायालयात पाठवण्याची तजवीज केली आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रमोद वाघ करीत आहे.
Comments
Post a Comment