ग्रंथमित्र तानाजीराव मगदूम यांचे निधन.
ग्रंथमित्र तानाजीराव मगदूम यांचे निधन.
-----------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे माजी कार्यवाह ,कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष, मुरगूड नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, ग्रंथमित्र तानाजीराव अनंत मगदूम वय (७३) यांचे आकस्मिक निधन झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील वाचन संस्कृती व ग्रंथालय चळवळ बळकट करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.गाव तेथे ग्रंथालय या शासनाच्या योजनेनुसार जिल्ह्यातील अनेक ग्रंथालये त्यांनी स्थापन केली.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन विवाहीत मुलगे,दोन विवाहीत मुली,सुना व नातवंडे असा परिवार आहे.
सोळांकुर महाविद्यालयाकडील क्रीडा अधिकारी प्रा. सुशांत मगदूम व मुरगूड विद्यालयाचे ग्रंथपाल प्रशांत मगदूम यांचे ते वडील होत.
Comments
Post a Comment