राधानगरी येथे महसूल सप्ताह निमित्त 22 कर्मचाऱ्यांनी रक्तदान व साठ कर्मचाऱ्याने आरोग्य तपासणी केली.तहसीलदार अनिता देशमुख.
----------------------------------------------------------
फ्रंटलाईन महाराष्ट्र न्यूज.
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
----------------------------------------------------------
राधानगरी येथे महसूल सप्ताह निमित्य महसूल कर्मचाऱ्यांनी रक्तदान व आरोग्य शिबिरास चांगल्या पद्धतीने सहकार्य करून शासनाला मदत केल्या असल्याची माहिती राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी दिली.
राधानगरी तहसीलदार कार्यालय मध्ये एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या कालावधीमध्ये महसूल सप्ताह साजरा केला जातो त्यामध्ये आज तहसील कार्यालय मध्ये रक्तदान व आरोग्य शिबिर आयोजित केले होते त्या शिबिरामध्ये 22 महसूल कर्मचाऱ्यांनी व 60 महसूल कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घेतली व शासनाला बहुमूल्य सहकार्य केल्याबद्दल महसूल कर्मचाऱ्यां ना धन्यवाद देऊन असं सहकार्य करत रहावे असे आव्हान राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी केले आहे.
या कार्यक्रमास राधानगरी तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार ऋतुराज निकम सुबोध वायंगणकर मंडळ अधिकारी सुंदर जाधव तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र शेटे व राधानगरी तालुका भाजपचे अध्यक्ष संभाजी आरडे सातापा बोडके तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.
0 Comments