अपघातास प्रवृत्त करणाऱ्या आम्हास दमदाटी करणाऱ्या मग्रूर एअरटेल ठेकेदारावर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करा .किरण बगाडे.
अपघातास प्रवृत्त करणाऱ्या आम्हास दमदाटी करणाऱ्या मग्रूर एअरटेल ठेकेदारावर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करा .किरण बगाडे.
----------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------
सविस्तर :- मेढा केळघर या प्रजीमा वर एअरटेल केबल टाकण्याचे खोदकाम सुरू आहे हे खोदकाम 1 ते 33 नियम अटी ला अधीन राहून खोदकाम करणे बंधनकारक असतानाही सदर ठेकेदार हा मनमानी पद्धतीने काम करत आहे सहभागी सा. बां.विभागा च्या परवानगीनुसार मध्यभागापासून 15 मीटरच्या पलीकडे खोदकाम करणे बंधनकारक असतानाही सदर ठेकेदार रस्त्यावरच माती टाकून नागरिकांचे अपघात होण्याची वाट पाहत आहे की काय ? तसेच सदर काम चालू असताना महामार्गावर दिशादर्शक फलक थांबा, सावकाश जा, रिफ्लेक्टर, तसेच रात्रीच्या वेळी बंद चालू एलईडी लाईट सेवा देणे, बंधनकारक असतानाही सदर ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करत आहे तरी या अगोदर अनेक अपघात घडले आहेत याला जबाबदार कोण ? सदर बाबत मी विचारणा केली असता तुझा कामावर याचा संबंध नाही माझी वरपर्यंत ओळख आहे माझ्या नादाला लागू नकोस नाहीतर मी आत्महत्या करून तुझ्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवीन असा दम मला मारून तुझ्याकडे मी बघतो अशी फोन द्वारे माझ्याशी अपमानास्पद वागणूक केले आहे तरी शासनाचे मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या व अपघातास प्रवृत्त ठरणाऱ्या व दमदाटी करणाऱ्या मुजोर ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करून काम तात्काळ बंद करून ठेकेदारावर कारवाई करा अन्यथा RPI स्टाईल ने काम बंद करणार असा इशारा किरण बगाडे यांनी दिला आहे
Comments
Post a Comment