कोपरखैरणे रेल्वे स्थानक बस सेवेपासून वंचित.
कोपरखैरणे रेल्वे स्थानक बस सेवेपासून वंचित.
नवी मुंबई :-कोपरखैरणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला बोनकोडे गावाचे दिशेने व घणसोली स्थानकाच्या दिशेने नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेच्या वतीने बस थांबे बांधण्यात आले आहेत परंतु तिथून कोणतीच बस सेवा चालू नसल्याचे निदर्शनास आले आहे.
मोठमोठे हॉटेल, हॉस्पिटल, दवाखाने, ट्यूटोरियल क्लासेस असलेले कोपरखैरणे नवी मुंबईतील शिक्षणाचे माहेरघर म्हणण्यास हरकत नाही कारण इथे लहान मोठे पॉलिटेक्निकल, इंजीनियरिंग, डिझायनिंग, फार्मसी संबंधित महाविद्यालये आहेत याशिवाय सीबीएससी, आयसीएएससी, सरकारी, खाजगी शाळा आहेत. त्यामुळे बाहेरून शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासा करिता केवळ रिक्षाचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच पूर्व दिशेला मीटर प्रमाणे रिक्षा चालत नसून केवळ शेअरिंग रिक्षा चालत असल्याने दुपारच्या वेळेस एमआयडीसी भागात जाण्यासाठी मीटर प्रमाणे न जाता मनमानी भाडे आकारून प्रवास करावा लागत आहे. पश्चिम दिशेला देखील नियोजनबद्ध रिक्षा स्टॅन्ड दिसून येत नाही
याबाबत रिक्षा संघटना ही उदासीन असल्याने रिक्षा चालक भाडे मिळवण्यासाठी बेकायदेशीरपणे रिक्षा उभ्या करत आहेत, त्याकरिता आरटीओ द्वारे गर्दीच्या वेळी दोन पोलिसांना तैनात करावे लागते. जर पोलीस कर्मचारी आले नाही तर सायंकाळच्या वेळेस ट्रॅफिकची समस्या निर्माण होणे नित्याची बाब झाली आहे.
सिडको ने स्टेशनच्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व जागा पार्किंग साठी नियोजित केली असून केवळ सिडको तिजोरी भरण्याचे काम करीत आहे. यावर सिडको प्रशासन व नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेने मिळून तातडीने निर्णय घ्यावा अशी चर्चा जोर धरत आहे.
Comments
Post a Comment