वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त कृषी विभागाच्या योजनांचा सप्ताह..
वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त कृषी विभागाच्या योजनांचा सप्ताह..
हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त 18 तारीख ते 24 ऑगस्ट पर्यंत कृषी विभागाच्या सर्व योजना राज्यातील सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी योजनांचा माहिती सप्ताह मेळावा तारळे खुर्द येथे विठ्ठल मंदिर मध्ये कृषी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी तारळे खुर्द ग्रामपंचायतचे लोक नियुक्त सरपंच सरिता पॏडकर या बोलताना म्हणाल्या शेतकऱ्यांनी या सप्ताह मेळाव्यामध्ये आयोजित विविध शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा. आपली आर्थिक प्रगती करून घ्यावी. यावेळी मंडळ कृषी अधिकारी रणजीत गोंधळी यांनी विविध योजनांची उपस्थित शेतकऱ्यांना परिपूर्ण अशी माहिती दिली यामध्ये काजू फळबाग विकास योजना ,महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाळ लागवड , व्हर्मीकंपोस्ट युनिट उभारणी. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, महाडीबीटी अंतर्गत यांत्रीकरणी योजना पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ड्रीप व तुषार सिंचन संच, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा सहानुग्र अनुदान योजना ,पीएम प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजना ,मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी खरीप हंगाम पीक स्पर्धा एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 -24 निमित्ताने आहारातील पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व याबद्दल उपस्थित यांना मार्गदर्शन केले व इतर योजनांची माहिती दिली यावेळी माजी सरपंच बंडोपंत पाटील यांनी स्वागत केले .यावेळी कृषी सहाय्यक राहुल पाटील यांनी प्रास्ताविक केले कृषी सहाय्यक एम .एस .कांबळे एम .जे .गवळी आदी मान्यवरांसह या पंचक्रोशीतील बहु संख्येने शेतकरी उपस्थित होते.
Comments
Post a Comment