Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पुणे जिल्ह्यातील पोंदेवाडी गावचा पंधरा ऑगस्ट.

 पुणे जिल्ह्यातील पोंदेवाडी गावचा पंधरा ऑगस्ट.









-------------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मेढा प्रतिनिधी

 प्रमोद पंडित

-------------------------------------------------

संपूर्ण गावाला जेवण देण्याची परंपरा....

स्वातंत्र्य दिनादिवशी मागील चाळीस वर्षे.

पारगाव - आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील पोंदेवाडी या गावातील बुजुर्गांकडून ४० वर्षापूर्वी सुरु केलेल्या शाळा सुधार फंडातून मागील ४० वर्षापासुन स्वातंत्रदिनी तसेच प्रजासत्ताक दिनी शाळेतील विद्यार्थ्यांना व संपूर्ण गावाला गोड जेवण देण्याची परंपरा जपली.

यावर्षीही स्वातंत्रदिनी सुमारे एक हजार जणांना बुंदी, बटाटा मटकी भाजी, भात व भजी या पदार्थांचा आस्वाद घेतला या फंडातील शिल्लक रकमेतून शाळा इमारत, मंदीर दुरुस्ती अशा प्रकारे १० लाख रुपयांची विकास कामे झाली असुन गावातील गरजूंना हि आर्थिक मदत केली जाते प्रत्येकी अवघ्या एक रुपयांपासून सुरु केलेल्या फंडात आज नऊ लाख रुपयांची शिल्लक आहे पोंदेवाडी ग्रामस्थांची एकी इतर गावांसाठी आदर्शवत आहे.स्वातंत्रदिन व प्रजासत्ताक दिन या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांना लाडु, जिलेबी, बिस्कीट आदी प्रकारचा खाऊ वाटप केला जातो परंतु पोंदेवाडी येथील नाथा तुकाराम पोखरकर, स्वर्गीय बाबुराव सखाराम पोंदे, स्वर्गीय प्रभाकर गंगाराम पोंदे,

नारायण पोखरकर, कचरू भिकाजी दौंड, भगवंत नाना वीरकर, सदाशिव दत्तात्रय रोडे पाटील, शंकर रामभाऊ रोडे, स्वर्गीय भाऊ मारुती रोडे या जेष्ठ मंडळींनी १५ ऑगष्ट १९८२ रोजी प्रत्येकी अवघा एक रुपया वर्गणी काढून शाळा सुधार फंडाची स्थापना केली.यातून स्वातंत्रदिन व प्रजासत्ताक दिन या दिवशी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला जात होता दिवसेंदिवस या रकमेत वाढ होत गेली लाखो रुपये जमा होऊ लागले. या रकमेतून गावातील गरजूंना आर्थिक मदत केली जाते त्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजातून गावात विविध प्रकारची विकास कामे केली आहेत जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शाळा, गडदादेवी मंदिर, बिरोबा मंदिर यासाठी मदत केली आहे.माध्यमिक विद्यालयाच्या नूतन इमारत बांधकामासाठी साडेसात लाख रुपयांची मदत अशा प्रकारे एकूण १० लाख रुपयांची विकास कामे झाली आहेत दरवर्षी या शिल्लक रकमेतून विद्यार्थी व संपूर्ण गावाला जेवण दिले जाते यावर्षी सुमारे एक हजार जणांना जेवण देण्यात आले हा खर्च भागवून यावर्षी फंदात नऊ लाख रुपये शिल्लक राहिले त्या रकमेतुन पुन्हा गावातील सुशिक्षित बेरोजगार युवक यांना व्यवसाय करण्यासाठी तर काही गरजू यांना मदत केली जाते.हे सर्वजण या रकमेची प्रामाणिकपणे परतफेड करतात या फंडाची जबाबदारी नवीन पिढीतील माजी सरपंच जयसिंग पोंदे, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळूंज, उपसरपंच महेंद्र पोखरकर, माजी उपसरपंच संदीप पोखरकर, मनोहर पंचरास, माऊली पोंदे, भाउसाहेब पोंदे व गावातील युवक पहात आहे पोंदेवाडी ग्रामस्थांची एकी इतर गावांसाठी प्रेरणादायी आहे.

Post a Comment

0 Comments