विद्यार्थीनीच्या मागून घिरट्या घालणाऱ्या रोडरोमिओचां उपद्रव रोखण्याची गरज ...
विद्यार्थीनीच्या मागून घिरट्या घालणाऱ्या रोडरोमिओचां उपद्रव रोखण्याची गरज ...
गगनबावडा : – निवडे साळवण (ता.गगनबावडा ) येथे मोकाटपणे शाळा महाविद्यालयीन विद्यार्थीनींच्या मागून घिरट्या घालणाऱ्या रोडरोडिओच्या वाढत्या उपद्रव्यामुळे साळवण बाजारपेठ,वेतवडे व तिसंगी बस थांबा या ठिकाणी बसची प्रतिक्षा करणाऱ्या विद्यार्थीनीसह नागरिकांनाही नाहक त्रास सोसावा लागत आहे, सडक सख्या हरींच्या या उपद्रव्यामुळे विद्यार्थीनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गगनबावडा तालुक्यातील प्रमुख शैक्षणिक केंद्र असणाऱ्या तिसंगी येथे माध्यमिक शिक्षणापासून व उच्च शिक्षणापर्यंत सोय असल्यामुळे गगनबावडा तालुक्यासह इतर तालुक्यातील विद्यार्थी विद्यार्थीनी तिसंगी येथे शिक्षणासाठी येतात,यामध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये मूलींची संख्या ही अधिक आहे.
तिसंगी येथील दोन्ही महाविद्यालये सुटल्यानंतर विद्यार्थीनीना घरी जाण्यासाठी तिसंगी बस थांबा,वेतवडे फाटा व साळवण बाजारपेठ चौकातील दुकानांच्या ओसरीचा आधार घेऊन एस टी बस प्रतिक्षा करावी लागत आहे.याचा गैर फायदा घेत टवाळघोर तरुण शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी यां थांबलेल्या ठिकाणी दुचाकीवरून घिरट्या घालत असतात तसेच शाळा महाविद्यालयापासून बस थांब्याचे अंतर लांब असल्यामुळे विद्यार्थीनीना एसटी बस साठी महाविद्यालयापासून पायपीट करत चालत जावे लागत आहे,अशातच या रोडरोमिओंच्या दुचाकी विद्यार्थीनींचा पाठलाग करत घिरट्या घालत असतात,त्यामुळे शाळा महाविद्यालयीन विद्यार्थीनीसह या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या नागरिकानाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थींनीच्या मागून घिरट्या घालणाऱ्या व निवडे साळवण बाजारपेठ तसेच वेतवडे फाटा याठिकाणी ठिय्या मांडून थांबणाऱ्या रोडरोमिओना लगाम घालण्याची गरज निर्माण झाली आहे,त्यामुळे स्त्रीयांच्या सुरक्षतेसाठी निर्माण केलेल्या निर्भया पथकाला या ठिकाणी पाचारण करुन मोकाटेपणे महाविद्यालयीन विद्यार्थींनीच्या मागे घिरटया घालणाऱ्या सडक हरींवर गगनबावडा पोलिसांनी कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
Comments
Post a Comment