Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद, कोल्हापूर सरळसेवा पदभरती 2023

 जिल्हा परिषद, कोल्हापूर सरळसेवा पदभरती 2023

--------------------------------------------
रजनी सचिन कुंभार 
-----------------------------------------------

      जिल्हा परिषद सरळ सेवा भरती 2023 मधील विविध पदांकरिता ऑगस्ट 23 मध्ये जाहिरातीद्वारे उमेदवाराकडून अर्ज मागणी करण्यात आले होते यानुसार दिनांक 7 ऑक्टोबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात सरळसेवा भरतीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यात आज दि.08 ऑक्टोंबर रोजी विस्तार अधिकारी (सांख्यिकी) या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली जिल्ह्यातील विविध केंद्रांवर सदर परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते ही परीक्षा आयबीपीएस कंपनीमार्फत घेण्यात येत आहे आजच्या परीक्षेला एकूण 1040 उमेदवारांनी अर्ज केला होता त्यापैकी 872 उमेदवार परीक्षेकरिता उपस्थित होते जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर पुणे , रत्नागिरी , सांगली जिल्हा परिषदे करता अर्ज केलेल्या उमेदवाराची बैठक व्यवस्था करण्यात आली होती परीक्षा केंद्रांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन श्रीमती मनीषा देसाई यांनी समक्ष भेट दिली असून मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर परीक्षा सुरळीतपणे पार पडली आहे . दि.10 ऑक्टोंबर 2023 रोजी जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर विस्तार अधिकारी (कृषि) व आरोग्य पर्यवेक्षक पदाची ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेकरता रत्नागिरी जिल्ह्यातील उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे.

Post a Comment

0 Comments