कागल तालुक्यातील सर्व महिला सरपंच व महिला पोलीस पाटील यांचा होणार सन्मान.......निमित्त ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दौलतरावजी निकम यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य...... कागल तालुक्यातील सर्व प्रमुख नेत्यांच्या सुनबाई उपस्थित राहणार.......

-----------------------------------------------------------
----------------------------------------------------------
व्हन्नूर ता.कागल येथील श्री.दौलतराव निकम माध्यमिक विद्यालयात ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी माजी आमदार स्वर्गीय दौलतरावजी निकम यांची जन्मशताब्दी गेलं वर्षभर अनेक उपक्रमांनी साजरी होत आहे.याचेच औचित्य साधून मंगळवार दिनांक 3 ऑक्टोंबर रोजी भव्य महिला मेळावा साजरा होत आहे.
या मेळाव्यामध्ये कागल तालुक्यातील महिला सरपंच व महिला पोलीस पाटील यांचा सन्मान होणार आहे तर महिलांसाठी गौरी गीते,हंडा-घागर,उखाणे,ओव्या, छुई-फुई,फुगे फुगवणे यासारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.विजेत्यांना भव्य व आकर्षित बक्षिसे देण्यात येणार आहेत.
या भव्य महिला मेळाव्यासाठी कागलचे आमदार हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक,माजी आमदार संजयबाबा घाटगे,स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे या कागल मधील प्रमुख नेत्यांच्या सुनबाई उपस्थित राहणार आहेत.
Comments
Post a Comment