गांधीनगरसह परिसरातील हद्दवाढ प्रस्तावित गावात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद.
गांधीनगर:- शहर हद्दवाढीला 18 गावांनी हद्दवाढी विरोधात एल्गार पुकारून गुरुवारी गांधीनगर व्यापारीपेठे सह गडमुडशिंगी, उचगाव, वळीवडे, सह अन्य गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून हद्दवाढीला विरोध केला. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठेतील व्यवहार ठप्प होते.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर शहराच्या हद्द वाढीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे जाहीर केले आहे. त्याला हद्दवाढीतील प्रस्तावित गावांचा विरोध आहे . पहिल्यांदा शहराचा विकास करा, मगच हद्दवाढ करा असा निश्चय हद्दवाढ प्रस्तावित गावातील लोकप्रतिनिधीसह ग्रामस्थांनी केला आहे. गांधीनगर बाजारपेठेतील होलसेल, रिटेल, व्यापाऱ्यांनी तसेच ट्रान्सपोर्ट मालक-चालकांनी आपली दुकाने बंद ठेवून हद्द वाढीला विरोध दर्शविला. त्यामुळे गांधीनगर बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर तसेच अन्य मार्केटमध्ये शुकशुकाट होता. बंदमुळे परगावाहून येणाऱ्या काही ग्राहकांना खरेदी करता न आल्यामुळे हिरमोड झाला. आणि ग्राहक रिकाम्या हातानेच परतले.
गडमुडशिंगी, वळीवडे येथील व्यापारी, ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवून हद्द वाढीला विरोध दर्शविला.
फोटो ओळ:- गांधीनगर येथील व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून हद्द वाढीला विरोध दर्शविला. त्यामुळे नेहमी गजबजलेला मुख्य रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळाला.
0 Comments