डॉक्टर दिग्विजय पाटील व मदतनीस राजू चव्हाण यांना अटक.

 डॉक्टर दिग्विजय पाटील व मदतनीस राजू चव्हाण यांना अटक.

----------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे

----------------------------------------

 राधानगरी येथील अवैध गर्भपात प्रकरणी कागल पोलिसांनी चौकशीअंती सध्या गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेले स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर दिग्विजय अभय पाटील (रा. शनिवार पेठ कोल्हापूर )व त्याचा मदतनीस राजू केशव चव्हाण (रा. तालुका राधानगरी,, या दोघांना अटक केली आहे . न्यायालयात हजर केले असता त्या दोघांना चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आल्याचे कागल पोलिसांनी सांगितले.

मार्च 2023 मध्ये राधानगरी ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या या प्रकाराची गंभीर दखल घेत तपास सुरू झाला होता. कागल येथील एका पिढीत महिलेने यासंबंधी पोलिसात तक्रार दिली होती. पती आणि सासू शारीरिक व मानसिक छळ करीत आपला बळजबरीने गर्भपात केल्याची तक्रार कागल पोलिसात देण्यात आली होती. या तपासामधूनच गर्भपात होत असल्याचा मोठा प्रकार उघडकीस आला. या तपासात डॉक्टर दिग्विजय पाटील यांनी ड्युटीच्या दिवशी कोणताही केस पेपर अथवा नोंद न करता गर्भपात केल्याचे निदर्शनास आले. या घटनेचा अधिक तपा

स पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार करीत आहेत.


Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.