हुपरीत ऊसाला आग लागून लाखोचे नुकसान.

 हुपरीत ऊसाला आग लागून लाखोचे नुकसान.

हुपरी तालुका हातकणंगले येथे वाळवेकरनगर लगत महावीर गाट अनिल गाट व अरूण गाट उसाचे रान आहे. दुपारी तीन वाजता शॉर्टसर्किटने उसाला आग लागून लाखोच्या घरात नुकसान झाले आहे.

लाईटचे पोल व वायर 50 ते 60 वर्षापासून असल्याने वायर खराब झालेली होती.महावितरण कंपनीला वारंवार शेतकरी सांगून देखील त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.. असे सारखे शॉर्टसर्किटमुळे ऊसाला आग लागून शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत असते. या महावितरण कंपनीच्या गलथन कारभारामुळे शेतकरी वैतागला आहे. गाट यांच्या शेता लागून ऊस तोडणी झाले आहे . त्यामुळे इतर ऊसाला आग लागली नाही .नाही तर 50ते 60 एकर ऊस पेट घेतला असता. शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असते.तसेच वाळवेकर नगर येथील रहिवाशांना देखील याची झळ पोचली असती. जीवित हानी देखील होण्याचा संभव होता. 

महावितरण कंपनीने लवकरात लवकर जुने वायर व पोल दुरुस्ती करावी व शेतकऱ्यांचा नुकसान झालेले महावितरण कंपनीने भरून द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. हुपरी नगरपरिषद चे अग्निशामक दल व जवाहर कारखान्याचे अग्निशामक दल यांनी आग आटोक्यात आणली.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.