फरारी आरोपीला बोरगांव पोलीसांनी ठोकल्या बेड्या !
फरारी आरोपीला बोरगांव पोलीसांनी ठोकल्या बेड्या !
सातारा : - कुडाळ पोलीस ठाणे जिल्हा सिंधुदुर्ग गुन्हा रजिस्टर नंबर 285/2023 ipc-392,34 प्रमाणे दाखल असले गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी शिवशरण सुभाष वालेकर वय वर्षे 19 राहणार खेडगी तालुका जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक सदर आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता त्याचे शोध करिता जिल्हा सिंधुदुर्ग कुडाळ पो स्टे चे PSI शिंदे सो, हे स्टाफ सह बोरगाव पो स्टेस आले त्यावेळी त्यांचे मदतीकरिता पोहवा 2202 स्वामी व पो ना 1166 चव्हाण असे देण्यात आले होते सदर आरोपीचा शोध घेत असताना अशी गोपनीय माहिती मिळाली की सदरचा आरोपी हा नागठाणे येथे वीट भट्टीवर काम करीत आहे त्या अनुषंगाने तेथे जाऊन माहिती घेत असताना त्यास पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याचे स्थितीत असताना बोरगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील स्टॉप यांनी त्यास पकडुन बोरगाव पोलीस ठाणेस दाखल झाले सदर कारवाई मध्ये बोरगावं पोलीसचे पोलिस निरीक्षक मा. तैलतुबडे व जिल्हा सिंधुदुर्ग कुडाळ पो स्टेचे psi शिंदे सो पो ना 1204 तांबे,पोना 1210 प्रभू,पोहवा 703 पाटील, बोरगाव पोस्टे चे पोहवा 2202 स्वामी व पोना 1166 चव्हाण पोह 498 सावंत यांनी सहभाग घेतला. संयुक्तरित्या कामगिरी पोलिसांना बजावली.
Comments
Post a Comment