Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

किसन वीर मध्ये जिल्हास्तरीय देशभक्त आबासाहेब वीर वक्तृत्व स्पर्धा.

 किसन वीर मध्ये जिल्हास्तरीय देशभक्त आबासाहेब वीर वक्तृत्व स्पर्धा.

--------------------------------

 वाई प्रतिनिधी

 कमलेश ढेकाणे

---------------------------------

जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय देशभक्त आबासाहेब वीर वक्तृत्व स्पर्धेत स्वप्नील सचिन पलूसकर, यशवंतराव चव्हाण सायन्स इन्स्टिट्युट सातारा याने कनिष्ठ महाविद्यालयीन गटात. तनिष्का चंद्रकांत कांबळे, अरविंद पवार पाटील माध्यमिक विद्यालय, वेळे हिने, शालेय स्पर्धेच्या मोठ्या गटात तर पुष्कर दिपक पिंपळे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालय, वाई याने लहान गटात प्रथम क्रमांकाचे करंडक प्राप्त केले.

स्पर्धेच्या उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे : कनिष्ठ महाविद्यालयीन गट द्वितीय क्रमांक कु. अर्पिता अमित जोशी, किसन वीर कनिष्ठ महाविद्यालय, वाई, तृतीय क्रमांक कु. नंदिनी निलेश शिंदे, भारत विद्यामंदीर व ज्युनिअर कॉलेज, वाघोली, चतुर्थ क्रमांक कु. वैष्णवी संदीप माने, मालोजीराजे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, लोणंद पाचवा क्रमांक कु. सायली बजरंग माळदक, द्रविड हायस्कूल, वाई

शालेय स्पर्धा मोठा गट : द्वितीय क्रमांक रोशन ज्ञानदेव वाशिवले, ज्ञानदीप इंग्लिश मिडिअम स्कूल, वाई तृतीय क्रमांक कु. प्रणाली विलास भोसले, प्रियदर्शिनी गर्ल्स हायस्कूल, भुईंज चतुर्थ क्रमांक कु. प्रज्ञा धोंडिराम वाडकर, द्रविड हायस्कूल, वाई पाचवा क्रमांक कु. ज्ञानेश्वरी सचिन जाधव, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालय, वाई

शालेय स्पर्धा लहान गट: द्वितीय क्रमांक निषाद ज्ञानेश्वर शिर्के, बाळासाहेब पवार हायस्कूल, उडतरे तृतीय क्रमांक कु. आरोही संतोष गायकवाड प्रियदर्शिंनी गर्ल्स हायस्कूल, भुईंज चतुर्थ क्रमांक कु. समृद्धी विजय ससाणे, कमलाताई जोशी केंजळ विद्यालय, केंजळ पाचवा क्रमांक कु. पुर्वा मनोहर वाडकर बापूसाहेब शिंदे माध्यमिक विद्यालय, चिखली

विजेत्यांना स्मृतीचिन्ह, रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन मा. प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे यांचे हस्ते गौरविण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. फगरे म्हणाले की, महाविद्यालयामार्फत शालेय वक्तृत्व स्पर्धा ५३ वर्षे अखंडपणे आयोजित करण्यात येत आहेत. तर कनिष्ठ महाविद्यालयीन स्पर्धेचे हे ४३ वे वर्ष आहे. वक्तृत्व कलेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी राजकीय व सामाजिक जीवनात उत्तुंग  प्राप्त केले. विद्यार्थ्यांचा या स्पर्धांना सातत्याने उर्त्स्फूत सहभाग मिळत आहे.

स्पर्धांचे उदघाटन जनता शिक्षण संस्थेचे संचालक मा. सुरेश यादव व मा. विठ्ठल माने यांचे हस्ते दीपप्रज्वलन व देशभक्त आबासाहेब वीर व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले.

प्रास्ताविक स्पर्धा समितीचे निमंत्रक श्री. हरेश कारंडे यांनी केले. स्पर्धेच्या नियमांचे वाचन श्री. सतिश तावरे यांनी केले. परीक्षक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ. शितल माने यांनी करुन दिला. श्री. अमोल पार्टे आणि दिगंबर बाबर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सौ. मंदा पवार यांनी केले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून कनिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी श्री. अमोल राऊत व सौ. शितल शिंदे यांनी काम पाहिले. तर शालेय गटासाठी डॉ. संग्राम थोरात व डॉ. अमोल कवडे, डॉ. चंद्रकांत कांबळे व डॉ. अरुण सोनकांबळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री. दशरथ पवार, उपप्राचार्य श्री. विवेक सुपेकर, पर्यंवेक्षक श्री. बाळासाहेब कोकरे, शिक्षक श्री. गणेश चव्हाण, श्री. श्रावण पवार, स्नेहल पाटणे, श्री. राजन करपे, श्री. शशांक ढोणे, सौ. सरिता वैराट, कनिष्ठ लिपीक श्री. सचिन शिंगटे, सेवक श्री. भानुदास चौधरी श्री. सचिन भोसले व श्री. विकास जाधव यांनी काम पाहिले.

स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्यातून एकूण ६७ स्पर्धक सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments