Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राजकारणात उलथापालथ होईल, तांबडे धान्य महाग होणार, रस भांडे महागेल, रोगराई अशीच राहणार,मिरगाचा पेरा होईल. श्री विठ्ठल बिरदेव यात्रेत फरांडे बाबांची भाकणूक.

 राजकारणात उलथापालथ होईल, तांबडे धान्य महाग होणार, रस भांडे महागेल, रोगराई अशीच राहणार,मिरगाचा पेरा होईल. श्री विठ्ठल बिरदेव यात्रेत फरांडे बाबांची भाकणूक.

---------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार 

---------------------------------------


वसगडेत श्री विठ्ठल बिरदेव यात्रेस उत्साहात प्रारंभ.

     राजकारणात उलथापालथ होईल, 

     तांबडे धान्य महाग होणार, 

     रस भांडे महागेल, 

     रोगराई अशीच राहणार,

     मिरगाचा पेरा होईल......

   अशी भाकणूक फरांडे बाबा तात्यादेव वायकुळे शिरसाव, ता. भूम, जिल्हा उस्मा
नाबाद यांनी हजारो भाविकांच्या उपस्थितीत वसगडे ता.करवीर येथील विठ्ठल बिरदेवाच्या यात्रेत हजारोंच्या उपस्थितीत केली. भाकणूक व हेडाम  खेळा वेळी भंडाऱ्यांची प्रचंड उधळण करीत भाविकांनी 'विठ्ठल बिरदेवाच्या नावानं. चांगभलं 'च्या गजराने धनगरी ढोलाच्या निनादाने परिसर दणाणून गेला होता.

   सकाळी भाणुस घरातुन यात्रेचे प्रथम मानकरी गाव कामगार पोलीस पाटील मा . संजय पाटील यांचे हस्ते शस्त्र जोड हत्यार मिरवणुकीने यात्रा कमीटीचे अध्यक्ष, उपसरपंच संजय पाटील,यात्रा कमिटीचे अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच योगिता बागडी, सदस्य,मानकरी, पुजारी व धनगर समाज यांचे समवेत मंदिरात येऊन पूजन करण्यात आले.त्यानंतर सर्व मानकरी यात्रा कमीटी, सरपंच , उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व भावीक मिरवणुकीने फरांडेबाबा विराजमान झालेल्या दगडी गादी जवळ येऊन तेथे फरांडे बाबाना शस्त्र व  कांबळी पुजन अर्पण करून मानाचे पानवीडे घेवुन फरांडे बाबाना विठ्ठल बिरदेव दर्शनासाठी सन्मानाने गादीवर भंडारा उधळुन आमंत्रीत केले . फरांडे बाबा ढोलांच्या वाद्यासह भंडाऱ्याची उधळण करत मंदीर मार्गावर हेडाम  नृत्य करत त्यांनी  मंडपामध्ये भाकणुक  सांगुन श्री विठ्ठल बिरदेव चे दर्शन घेतले या महत्वाच्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भावीकांनी गर्दी केली होती .

    यात्रेनिमित्य श्री विठ्ठल बिरदेवाची आकर्षक पुजा डॉक्टर बापू खंडू पुजारी ग्रामपंचायत सदस्य यांनी बांधली असून मंदिरर व परिसरात पानाफुलांची सजावट,लाइटिंग व मंदिरास मानाचा हार श्री विठ्ठल बिरदेव वालुग मंडळ वसगडे यांचे कडून सेवा अर्पण करण्यात आली. मंदीर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. भंडाऱ्याने संपुर्ण मंदीर परिसर पिवळा धमक झाला आहे.यात्रेमध्ये पुजा साहित्य भंडारा, मेवा मिठाई, खेळणी, यांचे स्टॉल लागले आहेत .

परंपरेप्रमाणे भाकणुकी नंतर फरांडेबाबानी गाव कामगार पोलीस पाटील यांचे घरीमानाची आंघोळ व जेवण करून उपवास सोडला.

यात्रेचा प्रमुख सोहळा पार पाडणेसाठी यात्रा कमीटीचे अध्यक्ष व वसागडेच्या लोकनियुक्त सरपंच योगिता बागडी, उपसरपंच अनिता सोनवणे,पोलीस पाटील संजय पाटील, ग्रामसेवीका संगिता बिरंबोळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य,तंटामुक्तीचे अध्यक्ष शशिकीरण हेरवाडे , माजी सरपंच नेमगोंडा पाटील डॉक्टर श्रीकांत चौगुले, सुदाम सोनवणे, कुलभूषण सुर्यवंशी, रंगा धनगर, शोभाताई राजमाने, धुळगोंडा पाटील, रावसो झोरे, सुनील पाटील,भुजगोंडा पाटील, विजय पाटील शेरीकर राजगोंडा सुर्यवंशी बाळासो उपाध्ये, पुजारी , धनगर समाज व ग्रामस्थ, भावीक मोठ्या संखेने उपस्थित होते . तसेच यात्रेमध्ये गांधीनगर पोलीस ठाण्याचे स.पो.नि. अर्जुन घोडे - पाटील आणी सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे .

Post a Comment

0 Comments