Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शिरोली येथील आठ वर्षीय फरहान इरफान मुल्ला हा गतिमंद मुलगा तलावात बुडून मृत्युमुखी ,नागरिकांच्या बरोबर पोलीस यंत्रणा ही भावनीक.

 शिरोली येथील आठ वर्षीय फरहान इरफान मुल्ला हा गतिमंद मुलगा  तलावात बुडून मृत्युमुखी ,नागरिकांच्या बरोबर पोलीस यंत्रणा ही भावनीक.

---------------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

शिरोली प्रतिनिधी 

अमित खांडेकर 

 ---------------------------------------------

फरहान ह गतिमंद असल्याने तो घरातून बाहेर कोठेही फिरत असायचा. व तो फिरून झालेकी परत घरी यायचा.  तो बुधवारी सकाळी घरातून गेला पण परत आला नाही. मग नातेवाईकांनी संपूर्ण गावात शोध घेतला पण सापडला नाही. दरम्यान शुक्रवारी सकाळी कांही तरुण गाव तलावाजवळ फिरत असता मृतदेह  पाण्यात तरंगताना दिसला ,

गेली दोन दिवस फरहानचे शोध कार्य  सरु होते पोलीस यंत्रणा ही अविरतपणे शोध कार्य घेत होती अक्षरशः फोटो दाखवून घरोघरी जाऊन शक्य त्या सर्व ठिकानी पोलीस  चौकशी करत होते 

त्यातच  शुक्रवारी सकाळी घटना निदर्शनास आल्याने नागरिक नातेवाईक आणि पोलीस ही भावनिक झाले अक्षरशः  डोळ्यात अश्रू आणून सर्व पोलीस यंत्रणा मृतदेह बाहेर काढणेसाठी प्रयत्न करत होती ,शिरोली पोलीस ठाण्याचे सहा  पोलीस निरीक्षक  पंकज गिरी यांनी स्वतः फरहान चा मृतदेह तळ्यातून बाहेर काढला आणि पुढील वैद्यकीय तपासणी साठी कोल्हापूर सीपीआर ला पाठवण्यात आला

Post a Comment

0 Comments