जावली गौरव पुरस्कारांचे रविवारी वितरण.

 जावली गौरव पुरस्कारांचे रविवारी वितरण.


--------------------------------------

फ्रंटलाईन न्युज  महाराष्ट्र 

जावळी विभाग प्रतिनिधि 

 शेखर जाधव

----------------------------------------

मेढा,ता.०२: जावली तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या मित्रमेळा फाउंडेशन या सामाजिक संस्थेकडून दरवर्षी देण्यात येणारे जावली गौरव पुरस्कार २०२३ जाहीर झाले असून येत्या रविवारी या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. 

जागतिक मराठी रंगभूमी दिनानिमित्त दरवर्षी ५ नोव्हेंम्बर रोजी मित्रमेळा फाउंडेशन या सामाजिक संस्थेकडून तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा जावली गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यावर्षी जावली नाट्यगौरव पुरस्कार हिंदुराव जाधव, नाट्यचळवळ पुरस्कार केदारेश्वर नाट्यविकास मंडळ, मामुर्डी, सामाजिक गौरव पुरस्कार कै. विजयराव मोकाशी, अध्यात्मिक साठी प्रवीण महाराज शेलार, शिक्षण क्षेत्रासाठी प्रमोद घाटगे, शेखर भिलारे, आनंदा जूनघरे, सायली शेलार साहित्यसाठी हरिशचंद्र भोसले, पर्यावरणसाठी सह्याद्री प्रोटेक्टर्स, कलासाठी सचिन जंगम, संगीतसाठी शंकरराव पवार, कृषीसाठी तुषार सपकाळ, क्रीडासाठी सुदेशना शिवणकर, प्रणित शेलार तसेच संस्कृती महिला मंडळ मेढा व डांगरेघर ग्रामस्थांचा विशेष सत्कार यावेळी होणार आहे. रविवार (ता. ०५) रोजी होणारा पुरस्कार वितरण सोहळा कलश मंगल कार्यालय मेढा येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रवीण पवार यांनी केला आहे.

Comments

Popular posts from this blog

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.