रिसोड काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन.
रिसोड काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन.
-----------------------------------------------फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजित ठाकुर
-----------------------------------------------
रिसोड तालुक्यातील अपुऱ्या पावसाने पिकांचे परिस्थिती समाधानकारक असल्यामुळे रिसोड तालुक्यातील दुष्काळ जाहीर करावा तसेच पिक विमा ची अग्रीम 25% रक्कम शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीने दिली नाही. तिच्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावे, तसेच शेतकऱ्यांना दिवसाच्या 12 तास अखंडित वीस पुरवठा करण्यात यावा. शेतमालाच्या पडलेला भावात भावा वाढ देण्यात यावी. या विविध मुद्द्यावर रिसोड काँग्रेस कमिटी यांच्यावतीने तहसीलदार तेजनकर मॅडम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बबनरावजी गारडे, अमोल भाऊ नरवाडे, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष रामेश्वर नरवाडे, जिल्हा परिषद सदस्य संतोष जाधव, युवक काँग्रेस उपाध्यक्ष राजूभाऊ खांबलकर, राजूभाऊ राऊत, गजानन निखाते, अनिकेत खरात, तसेच काँग्रेस कमिटी आणि युवक काँग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनाची दखल त्वरित न घेतल्यास आंदोलन करू असे आवाहन रिसोड काँग्रेस कमिटी रामेश्वर देवकर यांनी केले.
Comments
Post a Comment