Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

केशवनगर सरपंच पदी सौ छायाताई प्रवीण आखाडे यांची निवड.

 केशवनगर सरपंच पदी सौ छायाताई प्रवीण आखाडे यांची निवड.

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी 

रणजित ठाकुर 

-------------------------------

 रिसोड तालुक्यातील केशवनगर येथे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी सौ छायाताई प्रवीण आखाडे यांची ठरल्याप्रमाणे अडीच वर्षानंतर नियुक्ती झाली, यावेळी तहसीलचे अध्यासीअधिकारी म्हणून नायब तहसीलदार डी टी कुळमेथे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण सभा पार पडली, यावेळी ग्रामपंचायतचे उपसरपंच गजानन बाजड ग्रामपंचायत सदस्या त्रिवेणी ताई पुरी कांताबाई मांदळकर या चार सदस्यांच्या उपस्थितीत सरपंच पदाची निवड पार पडली , यावेळी  ग्रामपंचायतचे सचिव आर एस शिंदे यांनी निवडणूक अधिकारी नायब तहसीलदार डी टी कुळमेथे साहेब यांना सहकार्य केले, यावेळी नवनिर्वाचित सरपंच सौ आखाडे यांनी गावाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार असून गोरगरिबांची कामे गावातील विकास कामे संपूर्ण गावाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यांच्यासह गावात जेवढे विकास काम करता येतील त्यासाठी   पदाचे पुरेपूर उपयोग घेणार असल्याचा त्यावेळी उपस्थितांना सांगितले यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक शिवाजीराव सरनाईक, नंदू पाटील तहकीक,चौधरी मामा, प्रल्हाद पुरी वसंतराव मांदळकर , पोलीस पाटील सुभाष गायकवाड खिराडे सर ,आखाडे सर, प्रवीण आखाडे ,रामेश्वर खोटे ,दिनेश कावळे दीपक  भालेराव ,शिवाजी बाजड ,विठ्ठल मांदळकर,प्रदीप तहकीक,विजय जाधव ,पंढरी मांदळकर, मोनु खाकोले, लक्ष्मण अंभोरे, रोहिदास धबडघाव यांच्यासह गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ग्राम सरपंच पदाची निवडणूक झाल्यानंतर निवडणूक अधिकारी यांनी नवनिर्वाचित सरपंचाचे अभिनंदन केले व निवडीनंतर सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी केशवनगरचे आराध्य दैवत श्री बालाजी भगवान यांचे व छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेतले यावेळी नवनिर्वाचित सरपंचांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले ,

Post a Comment

0 Comments