49 वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये सातारा जिल्हा पोलीस दलास विजेतेपद.
49 वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये सातारा जिल्हा पोलीस दलास विजेतेपद.
----------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
सातारा जिल्हा प्रतिनिधी
अमर इंदलकर
----------------------------------------
49 वी कोल्हापुर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा जिल्हा सोलापूर येथे पार पडली. सदर स्पर्धेमध्ये कोल्हापूर परिक्षेत्रातील पुणे ग्रामीण, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर ग्रामीण व सोलापूर शहर अशा संघानी सहभाग घेतला होता. सातारा जिल्हा पोलीस दलाचे संघ व्यवस्थापक म्हणून श्री. विवेक लावंड, उपविभागीय पोलिस अधिकारी, पाटण विभाग, नियंत्रण व देखरेख अधिकारी म्हणून श्री. अभिजीत यादव, सहा. पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, सातारा शहर व क्रीडा प्रमुख म्हणून श्री. सुनील सपकाळ, पोलीस नाईक यांनी कामकाज पाहिले.
या स्पर्धेमध्ये पुरुष व महिला मिळून ॲथलेटिक्स सुवर्ण पदक १३, १५ रौप्य, ९ कांस्य, फुटबॉल १ सुवर्ण, हॉकी १ कांस्य, हॉलीबॉल १ सुवर्ण, २ रौप्य, वेटलिफ्टिंग ११ सुवर्ण, ४ रौप्य, ३ कांस्य, कुस्ती ७ सुवर्ण, ३ रौप्य, ज्युदो ०६ सुवर्ण, ३ रौप्य, ५ कांस्य, स्विमिंग ८ सुवर्ण, ४ रौप्य, ४ कांस्य, क्रॉस कंट्री ७ रौप्य, बास्केटबॉल १ सुवर्ण, कबड्डी १ कांस्य, खो - खो १ कांस्य अशी पदके सातारा संघास मिळाली आहेत.
सर्व क्रीडा प्रकारांमध्ये महिला व पुरुष संघाने सुवर्णपदक 48 रौप्य पदक 38 व कांस्यपदक 32 अशा एकूण 118 पदकांची कमाई केली. तसेच महिला संघाने 124 व पुरुष संघाने 142 गुण मिळवित 49 व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेची महिला व पुरुष गटाचे विजेतेपद मिळवलेले आहे.
पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये केलेल्या या उत्कृष्ट कामगिरी बाबत श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सर्व खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शकांचे देखील अभिनंदन केले. तसेच या पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Post a Comment