खा. उदयनराजेंकडून वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्यासाठी २.५० कोटींचा निधी मंजूर.

 खा. उदयनराजेंकडून वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्यासाठी २.५० कोटींचा निधी मंजूर.

----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

वाई प्रतिनिधी

कमलेश ढेकाणे

----------------------------

वाई तालुक्यातील विविध विकासकामांसाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भरघोस निधी देत महाराजांचे वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्यावर विशेष प्रेम असल्याचे दाखवून दिले आहे. वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्यातील कार्यकत्यांना ताकद देणेसाठीच तालुक्यात २ कोटी ५० लाखांचा विकास निधी दिली असल्याची माहिती वाई-खंडाळा-महाबळेश्वरच्या भाजपा निवडणूक प्रमुख डॉ. सुरभीताई भोसले यांनी दिली.

निधी मिळालेली वाई तालुक्यातील गावे (निधी लाखात) परखंदी येथे सभामंडप आणि सुशोभिकरण करणे १० लक्ष, धावडी येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे. ५ लक्ष, वेरुळी येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे ४ लक्ष, मांढरदेव, कोचळेवाडीमधील स्मशानभुमी बांधणे ५ लक्ष, शेलारवाडी पेव्हर्स ब्लॉक बसविणे ३ लक्ष, यशवंतनगर निशीगंधा हौ. सोसा. अंतर्गत संरक्षण भिंत बांधणे १० लक्ष, यशवंतनगर, संभाजीनगर रस्ता कॉक्रीटीकरण करणे ८ लक्ष, शहाबाग येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे १० लक्ष, बावधन मोरेश्वर वार्ड अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे १० लक्ष, व्याजवाडी, बाळसिद्धनाथ रस्ता काँक्रिटीकरण करणे ५ लक्ष, श्री. क्षेत्र धोम येथील स्मशानभुमी शेड सुशोभिकरण करणे १० लक्ष, काळंगवाडी हनुमान मंदिर समोरील सभामंडप आणि सुशोभिकरण करणे १० लक्ष, खंडाळा तालुक्यातील विकास कामे, हरिपूर अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे १० लक्ष, मौजे कोपर्डे बिरोबा मंदिरास सरंक्षण भिंत बांधणे ७ लक्ष, मौजे बावडा अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे ५ लक्ष, मौजे म्हावशी अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे ५ लक्ष, मौजे बावडा मळाई वस्ती चौक सुशोभिकरण करणे ५ लक्ष, मौजे धनगरवाडी येथे सुशोभिकरण करणे ७ लक्ष, मौजे वाघोशी येथील मारुती मंदिर सरंक्षण भिंत बांधणे ७ लक्ष, शिरवळ येथे अभ्यासिका बांधणे १० लक्ष, कानवडी अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे ५ लक्ष, खंडाळा येथे तानाजी चौक ते ऐतिहासिक सभामंडप बांधणे ५ लक्ष, लोणंद बंदिस्त गटर बांधणे ७ लक्ष, भादे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे ८ लक्ष, लोणंद रस्ता काँक्रिटीकरण करणे ७ लक्ष. महाबळेश्वर तालुक्यातील विकास कामे, मौजे राजपूरी येथील काँक्रिटीकरण करणे ७ लक्ष, खिंगर काँक्रिटीकरण करणे ७ लक्ष, गुरेघर येथील वेताळबाबा मंदिर ते विठ्ठल रकुमाई मंदिर रस्ता काँक्रिटीकरण करणे ७ लक्ष, कुरोशी अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे ७ लक्ष, माचुतर येथील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे ७ लक्ष, वेळापूर येथील दत्तवाडी येथे सभामंडप बांधणे ७ लक्ष, मेटतळे येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे ७ लक्ष, कुंभरोशी काँक्रिटीकरण करणे ७ लक्ष, अवकाळी येथील स्मशानभुमी शेड बांधणे ७ लक्ष, कारवी-आळा येथील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे ७ लक्ष, अशी माहिती वाई-खंडाळा-महाबळेश्वरच्या भाजपा निवडणूक प्रमुख डॉ. सुरभीताई भोसले, यांनी दिली.

वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघातील विकास कामे मंजूर करण्यासाठी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मदनदादा भोसले, डॉ. सुरभीताई भोसले, वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व मतदार संघातील नागरिकांच्या मागणीनुसार खासदार उदयनराजे भोसले यांनी निधी उपलब्ध केल्याबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.