सोमवारी होणार आधार कार्ड शिबिर.

 सोमवारी होणार आधार कार्ड शिबिर.

------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

------------------------------------

केंद्र सरकारच्या योजनांचा मोफत लाभ मिळाल्याने नागरिकांच्यातून समाधान...

गांधीनगर इथं भाजपच्या वतीने मोफत शिबीर.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना व्हावा या दृष्टीने खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीनगर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच रितू लालवानी यांनी दिनांक 16 आणि 17 रोजी मोफत शिबिराचे आयोजन केल असून त्याचं उद्घाटन नुकताच पंचायत राज, ग्रामविकास विभाग भाजपाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पाटील यांच्या हस्ते झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की,करवीर तालुक्यातील गांधीनगर येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सरपंच रितू लालवानी यांनी शनिवार दिनांक 16 आणि रविवार दिनांक 17 रोजी गांधीनगर व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या साठी मोफत शिबिराचे आयोजन केलेला आहे. या शिबिरामध्ये केंद्र सरकारच्या विविध योजनांचे मोफत कार्ड काढून दिले जाणार आहे. यामध्ये मोफत पॅन कार्ड काढणे, आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड,मोफत हेल्थ कार्ड,झिरो बॅलन्स बँक खाते काढणे, डिमॅट खाते काढणे अशा योजनांचा समावेश आहे. या शिबिराचे उद्घाटन भाजपा पंचायत राज आणि ग्रामविकास विभागाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पाटील, दक्षिण विधानसभेचे प्रमुख रवींद्र मुतगी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हेमंत पाटील, रवींद्र मुतगी यांनी शासकीय योजनांची माहिती दिली. याप्रसंगी रमेश तनवानी,रितू लालवानी, अमित बाठेजा,लक्ष्मी धामेजा, सरिता कटेजा, रीना अवघडे, रवी मलानी, दिपक जमणानी, मनोज बचवानी, बंडू सुंदराणी, अशोक धामेजा,मुरली आडवानी, मनोज आडवानी,गिरीश तन्ना यांच्यासह, भारतीय जनता पार्टी,बी एस एस,धनंजय महाडिक युवाशक्ती कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोमवार दिनांक 18 आणि मंगळवार दिनांक 19 रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत गांधीनगर पोलीस ठाण्यासमोर आधार कार्ड लिंक करणे, आधार कार्ड मधील चूक दुरुस्ती करणे याचे मोफत शिबिर होणार आहे याचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.