सुमारे सोळा लाखाचे दागिने हातो हात लंपास.

 सुमारे सोळा लाखाचे दागिने हातो हात लंपास.

---------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

शिरोली प्रतिनिधी

अमित खांडेकर 

--------------------------------------

शिरोली जकात नाका येथील प्रकार.

 शिरोली जकात नाका येथील ए एस  लॉन मध्ये लग्नाच्या स्वागत समारंभ निमित्त फोटो काढत असताना अंदाजे पंधरा लाख 80 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असलेली बॅग हातोहात अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार  केतन वीरेंद्र नंदेशवर व.व.36 राहणार बेळगाव कर्नाटक यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.

 या घटनेची अधिक माहिती अशी की दिनांक 18/ 12/ 2023 रोजी रात्री दहा वाजता शिरोली जकात नाका नजीक असलेल्या ए एस लॉन  येथे केतन वीरेंद्र नंदेशवन हे आपले मामेभाऊ यांच्या लग्नाच्या स्वागत समारंभास आपल्या कुटुंबासह आले होते फोटो काढतेवेळी त्यांच्या आईच्या पायाजवळ ठेवलेल्या बॅगेमधील सुमारे पंधरा लाख 80 हजार पाचशे रुपये किमतीचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले या चोरीचा तपास महीला सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील या करीत आहेत

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.