आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात.
---------------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर प्रतिनिधी
अन्सार मुल्ला
---------------------------------------
आज दुपारी कोल्हापूर नजीक रजपुतवाडी गावाजवळ आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, या अपघातात एक जण जखमी झाला आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. गारगोटी येथील कार्यक्रम आटपून अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर, जोतिबा दर्शनासाठी जात असताना रजपुतवाडी नजीक त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा अपघात झाला. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठं नुकसान झालं. या अपघातात एक जण जखमी झाला असून त्याची प्रकृती स्थिर आहे .तर आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे दुसऱ्या गाडीने जोतिबा दर्शनासाठी जाऊन त्यांचा पुढील कार्यक्रम करण्यासाठी ते रवाना झालेत .या अपघातामुळे कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती .
Comments
Post a Comment