लोकस्वातंत्र्यचे पत्रकार कल्याण व निरंतर दृष्टीदान कार्य अभिनंदनिय --डॉ.गजानन नारे पत्रकार महासंघ व वाचनालयाच्या मोतीबिंदू शिबिरात २०० ची तपासणी ६० रूग्णांची शस्त्रक्रियेसाठी सभापती शुक्ल यांचा जन्मदिन साजरा अकोला-- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पत्रकार कल्याण आणि अव्याहत सुरू असलेले दृष्टीदान व ईतर मानवसेवी सामाजिक उपक्रम स्तूत्य असून या संघटनेचे पदाधिकारी यासाठी अभिनंदनास पात्र आहेत. असे प्रतिपादन प्रभात किडस् स्कूलचे संचालक,समाजसेवी डॉ.गजानन नारे यांनी कुरणखेड येथे मोतीबिंदू शिबीराच्या उद्घाटनपर भाषणातून केले.या उपक्रमासाठी त्यांनी पत्रकार महासंघ व सार्वजनिक विवेकानंद वाचनालयाला शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी दिप प्रज्वलन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,संत गाडगे बाबा,यांना वंदन करून गणित तज्ञ रामानुजन आणि स्व.डॕडी देशमुखांना अभिवादन करण्यात आले तथा परिसरातील दिवंगत व्यक्तींना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.दम्माणी नेत्र रूग्णालय,अकोला आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे हॅंगींग गार्डन यांच्या वैद्यकिय सेवा सहकार्यातून हा उपक्रम होता. महासंघ आणि वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने समाजसेवी स्व.डॕडी देशमुख यांचे स्मरणार्थ या मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया निवड शिबीराचे आयोजन अकोल्याजवळील कुरणखेड येथे करण्यात आले होते.वाचनालय अध्यक्ष मनोज देशमुख या उपक्रमांचे संयोजक होते.याप्रसंगी सभापती शुक्ल यांचे प्रथम चंडिका माता मंदिरात व नंतर व्यासपीठावर जन्मदिन अभिष्टचिंतन करण्यात येऊन त्यांना शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.संजय देशमुख यांनी विद्यालयातून गणितामध्ये प्रथम येणाऱ्या मुलाला त्यांचे वडील स्व.माणिकराव देशमुख यांचे स्मरणार्थ देऊ केलेले बक्षिस मुख्याध्यापकांच्या स्वाधीन केले. नेहमीच्या विशेष मानवतावादी सेवेबद्दल माॕं चंडिका आपात्कालीन बचाव पथकाचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ व वाचनालयाकडून विशेष सन्मानपत्र देऊन यावेळी गौरव करण्यात आला. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष व ईलना राष्ट्रीय सचिव संजय एम.देशमुख यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या उद्घाटनपर कार्यक्रमाला दम्माणीचे मुख्य व्यवस्थापक सभापती शुक्ल,पं.स.सदस्या सौ.सुषमा ठाकरे,सरपंच सौ. प्रगती पांडे,माजी पं.स.सदस्य प्रशांत पांडे,बोरगाव मंजू ठाणेदार मनोज केदारे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.यावेळी सभापती शुक्ल व ठाणेदार केदारे यांनी मनोगतातून शुभेच्छा व्यक्त केल्या.याप्रसंगी गजानन महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक रणजित सोळंके, लोकस्वातंत्र्यचे पुष्पराज गावंडे,विजयराव बाहकर,राम मुळे,प्रा.सुभाष देशमुख,पंकज देशमुख,गुलाब दुबे,यांची विशेष उपस्थिती होती.या शिबीरात दम्माणी रूग्णालयाचे मुख्य शल्य चिकित्सक डॉ.मनिष हर्षे यांचे मार्गदर्शनाखाली डॉ.दत्ता पवार व डॉ.दिपीका तेलगोटे यांनी कुरणखेड परिसरातील २०० रुग्णांच्या तपासण्या करून ६० रूग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड केली.तर अजय देशमुख आणि सहकाऱ्यांनी या रूग्णांना शस्त्रक्रियांच्या तारखा दिल्या.चष्मे व औषधी वाटपही यावेळी करण्यात आले. मनोज देशमुख यांचे बहारदार संचलनाखाली झालेला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उज्वल देशमुख,पत्रकार योगेश विजयकर, अतुल देशमुख,मंदा गवरकर, मृण्मयी जोशी,गजानन शेगोकार, रूपेश तलवारे, राजेश कानकिरड,विजय गरे, महेंद्रसिगं ठाकुर, नंदू धाडकर अमन महल्ले, निलेश देशमुख,गणेश धानोरकर, अनंता धानोरकर, प्रथम बरडे, आदित्य भेडकर,सागर सोळंके, प्रविण सोळंके व गजानन महाराज विद्यालय शिक्षक कर्मचारी यांनी सहकार्य केले.माँ चंडिका आपत्कालीन आपत्कालीन बचाव पथक व ग्रीन बॉईज ग्रुप कुरणखेड यांचे रग्णांना सहकार्याचे विशेष योगदान होते.प्रास्ताविक मनोज देशमुख यांनी तर आभाप्रदर्शन पत्रकार योगेश विजयकर यांनी केले. =========================== ☝️ *वृत्त प्रकाशनार्थ*
लोकस्वातंत्र्यचे पत्रकार कल्याण व निरंतर दृष्टीदान कार्य अभिनंदनिय --डॉ.गजानन नारे.
---------------------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
अकोला प्रतिनिधी
---------------------------------------------
पत्रकार महासंघ व वाचनालयाच्या मोतीबिंदू शिबिरात २०० ची तपासणी ६० रूग्णांची शस्त्रक्रियेसाठी
सभापती शुक्ल यांचा जन्मदिन साजरा.
अकोला-- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पत्रकार कल्याण आणि अव्याहत सुरू असलेले दृष्टीदान व ईतर मानवसेवी सामाजिक उपक्रम स्तूत्य असून या संघटनेचे पदाधिकारी यासाठी अभिनंदनास पात्र आहेत. असे प्रतिपादन प्रभात किडस् स्कूलचे संचालक,समाजसेवी डॉ.गजानन नारे यांनी कुरणखेड येथे मोतीबिंदू शिबीराच्या उद्घाटनपर भाषणातून केले.या उपक्रमासाठी त्यांनी पत्रकार महासंघ व सार्वजनिक विवेकानंद वाचनालयाला शुभेच्छा व्यक्त केल्या.
याप्रसंगी दिप प्रज्वलन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,संत गाडगे बाबा,यांना वंदन करून गणित तज्ञ रामानुजन आणि स्व.डॕडी देशमुखांना अभिवादन करण्यात आले तथा परिसरातील दिवंगत व्यक्तींना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.दम्माणी नेत्र रूग्णालय,अकोला आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे हॅंगींग गार्डन यांच्या वैद्यकिय सेवा सहकार्यातून हा उपक्रम होता. महासंघ आणि वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने समाजसेवी स्व.डॕडी देशमुख यांचे स्मरणार्थ या मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया निवड शिबीराचे आयोजन अकोल्याजवळील कुरणखेड येथे करण्यात आले होते.वाचनालय अध्यक्ष मनोज देशमुख या उपक्रमांचे संयोजक होते.याप्रसंगी सभापती शुक्ल यांचे प्रथम चंडिका माता मंदिरात व नंतर व्यासपीठावर जन्मदिन अभिष्टचिंतन करण्यात येऊन त्यांना शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.संजय देशमुख यांनी विद्यालयातून गणितामध्ये प्रथम येणाऱ्या मुलाला त्यांचे वडील स्व.माणिकराव देशमुख यांचे स्मरणार्थ देऊ केलेले बक्षिस मुख्याध्यापकांच्या स्वाधीन केले.
नेहमीच्या विशेष मानवतावादी सेवेबद्दल माॕं चंडिका आपात्कालीन बचाव पथकाचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ व वाचनालयाकडून विशेष सन्मानपत्र देऊन यावेळी गौरव करण्यात आला.
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष व ईलना राष्ट्रीय सचिव संजय एम.देशमुख यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या उद्घाटनपर कार्यक्रमाला दम्माणीचे मुख्य व्यवस्थापक सभापती शुक्ल,पं.स.सदस्या सौ.सुषमा ठाकरे,सरपंच सौ. प्रगती पांडे,माजी पं.स.सदस्य प्रशांत पांडे,बोरगाव मंजू ठाणेदार मनोज केदारे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.यावेळी सभापती शुक्ल व ठाणेदार केदारे यांनी मनोगतातून शुभेच्छा व्यक्त केल्या.याप्रसंगी गजानन महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक रणजित सोळंके, लोकस्वातंत्र्यचे पुष्पराज गावंडे,विजयराव बाहकर,राम मुळे,प्रा.सुभाष देशमुख,पंकज देशमुख,गुलाब दुबे,यांची विशेष उपस्थिती होती.या शिबीरात दम्माणी रूग्णालयाचे मुख्य शल्य चिकित्सक डॉ.मनिष हर्षे यांचे मार्गदर्शनाखाली डॉ.दत्ता पवार व डॉ.दिपीका तेलगोटे यांनी कुरणखेड परिसरातील २०० रुग्णांच्या तपासण्या करून ६० रूग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड केली.तर अजय देशमुख आणि सहकाऱ्यांनी या रूग्णांना शस्त्रक्रियांच्या तारखा दिल्या.चष्मे व औषधी वाटपही यावेळी करण्यात आले.
मनोज देशमुख यांचे बहारदार संचलनाखाली झालेला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उज्वल देशमुख,पत्रकार योगेश विजयकर, अतुल देशमुख,मंदा गवरकर, मृण्मयी जोशी,गजानन शेगोकार, रूपेश तलवारे, राजेश कानकिरड,विजय गरे, महेंद्रसिगं ठाकुर, नंदू धाडकर अमन महल्ले, निलेश देशमुख,गणेश धानोरकर, अनंता धानोरकर, प्रथम बरडे, आदित्य भेडकर,सागर सोळंके, प्रविण सोळंके व गजानन महाराज विद्यालय शिक्षक कर्मचारी यांनी सहकार्य केले.माँ चंडिका आपत्कालीन आपत्कालीन बचाव पथक व ग्रीन बॉईज ग्रुप कुरणखेड यांचे रग्णांना सहकार्याचे विशेष योगदान होते.प्रास्ताविक मनोज देशमुख यांनी तर आभाप्रदर्शन पत्रकार योगेश विजयकर यांनी केले.
===========================
☝️ *वृत्त प्रकाशनार्थ*
Comments
Post a Comment