नागाव च्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी भरत पाटील तर उपाध्यक्षपदी संजय वडार यांची बिनविरोध निवड :- सर्व राजकीय गटांना संधी म्हणून दोन उपाध्यक्ष निवडणेवर एकमत.
नागाव च्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी भरत पाटील तर उपाध्यक्षपदी संजय वडार यांची बिनविरोध निवड :- सर्व राजकीय गटांना संधी म्हणून दोन उपाध्यक्ष निवडणेवर एकमत.
--------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
शिरोली नागाव प्रतिनिधी
अमित खांडेकर
---------------------------------
नागाव, ता. हातकणंगले येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदी पाटील पॅनेल चे भरत पाटील तर उपाध्यक्ष पदी संयुक्त विकास आघाडी चे नेते संजय वडार यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
त्याच बरोबर सर्वानुमते ठरलेनुसार आणखी एक उपाध्यक्ष करणेचा आहे नागाव विकास आघाडी तर्फे दुसऱ्या उपाध्यक्षांचे नाव देणेत येईल:- आज शुक्रवार दि 22 डिसेंबर 2023 रोजी तंटामुक्ती समिती गठन करण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्ष स्थानी सरपंच विमल शिंदे या होत्या.ग्रामसभेच्या विषय पत्रिकेवरील विषय क्रं 2 महात्मा गांधी तंटामुक्ती समिती गठित करणे या विषयावर चर्चा होऊन भरत पाटील अध्यक्ष पदी तर संजय वडार यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.सूचक म्हणून पुरंदर शिरगावे होते,तर त्याला अनुमोदन विजय पाटील यांनी दिले.यावेळी उपसरपंच सुधीर ऊर्फ बंटी पाटील, ग्रामपंचायत सदस्य अमित खांडेकर, अभिनंदन सोळंकुरे,श्रेयस नागावकर,अजित घाटगे,अक्षय कांबळे,सागर गुडाळे, कुमार राठोड,ग्रामपंचायत सदस्या अश्विनी पाटील, सुलोचना कांबळे, मनीषा पाथरे, संगिता वायदंडे, मंगल चव्हाण,संगीता कोळी,शुभांगी पोवार,अश्विनी माळी, मोसमी कांबळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment