बोरगांव पोलीसांकडून अनेक गुन्हयात फरार असलेला अरोपी जेरबंद.
बोरगांव पोलीसांकडून अनेक गुन्हयात फरार असलेला अरोपी जेरबंद.
----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
सातारा जिल्हा प्रतिनिधी
अमर इंदलकर.
--------------------------------
सातारा शहर पोलीस ठाणे गु.र.नं 641/2023 भादविस कलम 307, 324, 325, 504, 506, 34 मधील पाहिजे असला आरोपी नामे सोन्या उर्फ मनोज प्रकाश वाघमारे रा.निगडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मूळ रा.कुमठे ता. जि.सातारा याने सातारा जिल्हा कारागृहात बंदी असलेले आरोपी बॅरेकच्या आवारात असलेल्या दगडाने बंदी असलेल्या विजय अंकुशी याने वाई न्यायालयात बंटी जाधव याचे वर फायरिंग केल्याचा राग मनात धरून मनोज प्रकाश वाघमारे आरोपी याने विजय अंकुशी याला डोक्यात व पाठीत जबर मारहाण करून जखमी केले होते व इतर दोघांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केलेली होती. गेले चार महिन्यापासून सदर आरोपी सोन्या उर्फ मनोज प्रकाश वाघमारे हा फरार होता सदर आरोपी हा वेचले गावात आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस बोरगाव पोलीस ठाण्याचे हद्दीत पेट्रोलिंग करत असलेले पोलीस नाईक बक्कल 1166 चव्हाण, पो कॉ 1269 जाधव यांना वेचले गावात रवाना करून सातारा शहर पोलीस ठाणे कडील पाहिजे असणारा वरील आरोपी हा पोलिसांना पाहताच पळून जात असताना पाठलाग करून वेचले गावचे हद्दीत हायवे जवळ त्यास ताब्यात घेऊन बोरगाव पोलीस ठाणेस हजर करून सातारा शहर पोलीस ठाणे येथे सदर बाबत माहिती कळवून सातारा शहर पोलीस ठाणे कडील अंमलदार यांच्या ताब्यात देण्यात आला
सदर कामगिरी बोरगावं पोलीस
( आर. जी. तेलतुंबडे )
सहाय्यक पोलीस निरीक्षक
बोरगाव पोलीस ठाणे. आणि अन्य पोलीस सहकारी यांनी बाजावली.
Comments
Post a Comment