लांडगेवाडी दरोडा प्रकरणातील आरोपीस अटक.
लांडगेवाडी दरोडा प्रकरणातील आरोपीस अटक.
----------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
नांदेड प्रतिनिधी
--------------------------------------------
नांदेड : लोहा तालुक्यातील माळाकोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लांडगेवाडी शिवारातील एका आखड्यावर दरोडा टाकून एका महिलेचा खून करून दागिने लंपास करणारा आरोपीस अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन विस्तृत माहिती दिली.
लोहा तालुक्यातील माळाकोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लांडगेवाडी शिवारातील आखाड्यावर दिनांक 21 नोव्हेंबर रोजी रात्री अज्ञात आरोपीने दरोडा टाकला होता. या दरोड्यात आखाड्यावरील वयोवृध्द जोडप्यास जबर मारहाण करण्यात आली होती . महिलेच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने जबरीने हिसकावून घेण्यात आले होते . तर महिलेला गंभीर मारहाण झाल्याने तिला उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हरविले होते मात्र सदर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध विविध कलमानखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते . या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी माळाकोळीचे पोलीस यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस यांची पथकाने करून तपास गतिमान करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी संबंधित सदरील घटनेतील आरोपींना तातडीने अटक करा असे आदेश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने , पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय केंद्रे यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सचिन उर्फ बोबड्या पिता बापूराव भोसले वय 27 वर्षे राहणार कुरळा तालुका कंधार जिल्हा नांदेड हल्ली मुक्काम ताडपांगरी तालुका जिल्हा परभणी यास दिनांक 3 डिसेंबर रोजी ताब्यात घेतले.
आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, धनंजय भोसले यांच्यासोबत लांडगेवाडी शिवारातील आखाड्यावर आपण दरोडा टाकला होता . याची त्यांनी कबुली दिली. शिवाय सदर आरोपीवर लोहा पोलीस ठाणे व इतर विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीकडून दरोड्यातील सोन्या चांदीचे दागिने, एक लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्या कडून तीन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. अशी माहिती ही पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली. यावेळेस अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय हे उपस्थित होते.
Comments
Post a Comment