म्हाकवेच्या कै. शरद कांबळे यांच्या कुटुंबीयांना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची मदत.
म्हाकवेच्या कै. शरद कांबळे यांच्या कुटुंबीयांना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची मदत.
-------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मुरगूड प्रतिनीधी
जोतीराम कुंभार
------------------------------------
कर्त्या कुटुंब प्रमुखाच्या जाण्याने कुटुंबीय हतबल.
म्हाकवे ता. कागल येथील कार्यकर्ते कै. शरद रत्नाप्पा कांबळे यांचे नुकतेच हृदयविकाराने अकाली निधन झाले. घरातील कर्ता कुटुंबप्रमुख गेल्यामुळे कुटुंब उघड्यावर पडले. या कुटुंबीयांना पालकमंत्री हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या ळवतीने ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मदतीचा हा धनादेश कुटुंबीयांकडे देण्यात आला.*
याबाबत अधिक माहिती अशी, भूमिहीन कुटुंब असलेल्या कै. शरद कांबळे यांच्या पाठीमागे आई श्रीमती विश्रांती कांबळे, पत्नी श्रीमती मंजुळा कांबळे, कु. शर्वरी व कु. रागिनी या दोन मुली, एक मुलगा कु. यश असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीय हतबल झाले. पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी त्यांना ५० हजारांची आर्थिक मदत दिली.*
यावेळी सिताराम गोरे, जीवन कांबळे, रमेश पाटील, महावीर कांबळे, आई श्रीमती विश्रांती कांबळे, पत्नी श्रीमती मंजुळा कांबळे, कु. शर्वरी व कु. रागिनी या दोन मुली, मुलगा कु. यश आदी प्रमुख उपस्थित होते.*
....................
फोटो
म्हाकवे ता. कागल येथील निधन झालेले कार्यकर्ते कै. शरद रत्नाप्पा कांबळे यांच्या कुटुंबीयांना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावतीने ५० हजारांची आर्थिक मदत देण्यात आली.*
===========
Comments
Post a Comment