पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त बाजारभोगावं (ता. पन्हाळा )येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न.
पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त बाजारभोगावं (ता. पन्हाळा )येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न.
-----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
पन्हाळा प्रतिनिधी
आशिष पाटील
----------------------------
न्याय मागण्यासाठी मोठ्या आशेने जनता न्यायालयात जाते, पण न्यायव्यवस्था धिम्या गतीने सुरू असल्याने लोकशाहीच्या या खांबाकडून लोकांच्या पदरात निराशा पडत आहे. लोकांना न्यायासाठी अपेक्षा आहे ती लोकशाहीचा चौथा खांब असणाऱ्या पत्रकारितेची. पत्रकारितेत मोठी ताकद आहे. पत्रकारिताच लोकशाही मजबूत ठेवू शकते. मात्र व्यावसायिककरणात पत्रकारितेतील विश्वासार्हता हरवू देवू नका. असे आवाहन माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले. पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने बाजारभोगाव (ता. पन्हाळा ) येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाजारभोगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. सिमा नितीन हिर्डेकर होत्या.
प्रारंभी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.यानंतर उपस्थित मान्यवरांसह पत्रकार संघाच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. नंदकुमार बुराण यांनी पत्रकार संघाच्या उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दुष्काळग्रस्त भागातील जनावरांना तीन ट्रक चारा , रक्तदान शिबीर , गरजू विद्यार्थ्यांंना शालेय साहित्य वाटप , निर्माल्य दान आदी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या या पत्रकार संघाचे कौतुक केले. यावेळी बाजार समिती व यशवंत बँकेचे संचालक अॕड. प्रकाश देसाई , कुंभी साखर कारखान्याचे संचालक पी.डी. पाटील , कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील , व्हिजन चॕरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे आदींनी मनोगते व्यक्त केली.
यानंतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्याना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून गौरवण्यात आले. यावेळी के,डी.सी.सी. बँकेच्या संचालिका श्रूतिका शाहू काटकर , उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पोवार , प्राथमिक शिक्षक बँकेचे उपाध्यक्ष अमर वरूटे , युवा नेते नितीन हिर्डेकर , धनंजय महाडिक युवा शक्तीचे पन्हाळा तालुका संघटक रोहन गुरव ,युवा उद्योजक अर्जुन काटकर , बाजारभोगावच्या माजी सरपंच माया नितीन पाटील , ग्रामपंचायत सदस्य अमोल कांबळे , अमर धनवडे , प्रशांत इंगळे , रंजना सुनिल शिंदे , मीना प्रविण पोतदार , सुवर्णा धर्मा खोत , बेबीताई केरबा कांबळे , संदीप मगदूम , दीपक मुगडे , धनाजी पाटील यांच्यासह पत्रकार संघाचे अध्यक्ष तानाजी पाटील , उपाध्यक्ष संग्राम पाटील , कार्याध्यक्ष रविंद्र पाटील , सचिव धनाजी गुरव , ज्येष्ठ पत्रकार पी. व्ही. पाटील , माजी अध्यक्ष अरूण तळेकर , विलास पाटील, कृष्णकुमार कांबळे आदीसह पत्रकार बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सरदार काळे यांनी केले. तर आभार रविंद्र पाटील यांनी मानले.
फोटो ओळ
माजी खास. राजू शेट्टी व माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते जीवनरक्षक हा पुरस्कार स्वीकारताना सौरभ पाटील, उपस्थित होते
Comments
Post a Comment