जावळीत मराठा समाज आरक्षणाचे समर्थनार्थ ट्रॅक्टर ची भव्य रॅली.
जावळीत मराठा समाज आरक्षणाचे समर्थनार्थ ट्रॅक्टर ची भव्य रॅली.
----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मेढा प्रतिनिधी
शेखर जाधव
----------------------------
जावळीची राजधानी मेढा येथे मराठा समाजाला आरक्षण मिळणेसाठी ट्रॅक्टर चालक , मालक यांनी भव्य रैली काढणेत आली मराठा आरक्षण साठी मुंबई मध्ये होत असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी , महाराष्ट्रात प्रथमच , जावळी तालुक्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने जनजागृतीसाठी भव्य अशी शांतताप्रिय ट्रँक्टर रॅली काढली होती .
जावळी तालुक्यातील एकमेव असलेले मामुर्डी येथील महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास पुष्पहार अर्पण करून , श्रीफळ वाढवून रैलीला सुरुवात करणेत आली ग्रामस्थ मंडळ , श्री केदारेश्वर विकास, भजन मंडळ, क्रिकेट क्लब मामुर्डी , शिवभक्त मामुर्डी तर्फे सकल मराठा समाजाचे स्वागत करणेत आले शिवस्मारक मामुर्डी पासुन चोरांबे पर्यत ट्रँक्टर ची लाईन लागली होती विशेष म्हणजे माजी आमदार सदाशिव भाऊ सपकाळ व संतोष वारागडे यांनी मामुर्डी ते मेढा ट्रँक्टर रॅलीत स्वतः ट्रँक्टर चालवित सहभाग घेतला होता त्यांचे सोबत सचिन जवळ सुद्दा होते मेढा दक्षीण विभाग कुसुंबी ते वागदरे, केळघर ते बिभवीतील शेतकऱ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला होता यामध्ये बरेच सरपंच हे स्वतः ट्रँक्टर घेवून रँलीत सहभागी झाले होते मामुर्डी तसेच भणंग गावचे तंटामुक्ती अध्यक्ष गणपत जाधव हे ही आपला ट्रॅक्टर घेऊन मोर्चा मध्ये सहभागी झाले होते
शासनाने लवकरच मराठ्यांना आरक्षण द्यावं अन्यथा जावळीकर मोठ्या संख्येने क्रांतीसुर्य मा मनोज जरांगे - पाटील यांच्या मुंबई मधील आंदोलनात सहभागी होणार असलेची माहीती समन्वयक विलास बाबा जवळ यांनी दिली एक मराठा ,लाख मराठा च्या घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला होता मामुर्डी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मेढा , पोलीस स्टेशन मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे लक्ष्मी पेठेतुन तहसिल कार्यालय मैदान अशी रॅली शांततेत पार पडली त्यानंतर सकल मराठा समाजाचे समन्वयक यांचे तर्फे जावळीचे तहसिलदार कोळेकर साहेब यांनी सकल मराठा समाजाचे निवेदन स्विकारले .
Comments
Post a Comment