स्व.माणिक पोदार लर्न स्कूल वाढोणा येथे स्वामी विवेकानंद व माँ जिजाऊ जयंती साजरी.
स्व.माणिक पोदार लर्न स्कूल वाढोणा येथे स्वामी विवेकानंद व माँ जिजाऊ जयंती साजरी.
-------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
-------------------------------------
रिसोड : स्वामी विवेकानंद व माँ जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय तपासणीचे आयोजन करण्यात आले.आपल्या सर्वांनी स्वामी विवेकानंद या एका प्रख्यात व्यक्तिमत्त्वाबद्दल ऐकले असेलच. १२ जानेवारी १८६३ रोजी कलकत्ता येथील दत्त कुटुंबात जन्मलेले स्वामी विवेकानंद हे भारताचे एक प्रतिष्ठित विद्वान, संत, विचारवंत, तत्त्वज्ञ आणि लेखक होते.प्रत्येक भारतीय नागरिक स्वामी विवेकानंदांना त्यांच्या आध्यात्मिक विचारांबद्दल नेहमीच लक्षात राहील. स्वामी विवेकानंद एक प्रसिद्ध धार्मिक, आणि हिंदू नेते आणि संत, आणि भारतातील रामकृष्ण मठ आणि मिशनचे संस्थापक आहेत.ते तेजस्वी संभाषण, सखोल आध्यात्मिक ज्ञान, त्याचे प्रभावी व्यक्तिमत्त्व. पाश्चात्य आणि पूर्वेकडील संस्कृतीच्या विस्तृत ज्ञानामुळे ते खूप प्रसिद्ध झाले. त्यांनी पाश्चिमात्य देशांमध्ये हिंदू धर्माचे भारतीय तत्वज्ञान मांडले आणि वेदांत चळवळीचे नेतृत्व केले. त्याच्या सन्मानार्थ, आम्ही दरवर्षी १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिवस साजरा करतो.लहानपणापासूनच स्वामी विवेकानंद त्यांच्या धार्मिक आईवर खूपच प्रभावित झाले होते, आणि त्यांच्या आयुष्याला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. ते श्री रामकृष्णांचे भक्त बनले.स्वराज्याचे स्वप्न बघणाऱ्या आणि फक्त बघणाऱ्याच नाही तर ते सत्यात देखील उतरवणाऱ्या, राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ यांचा 12 जानेवारी हा जन्मदिवस राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवलं, जर जिजामाता नसत्या तर कदाचित हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकलं नसतं.12 जानेवारी हा दिवस अख्ख्या महाराष्ट्राला लाभलेला सोनेरी दिवस आहे.या दिवशी राजमाता जिजाऊ यांची जयंती ,राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांना व त्यांच्या कार्याला अभिवादन केले जाते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद व माँ जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने प्रतिमेचे पूजन करून हारार्पण व दिपप्रज्वलंन करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन वर्ग 3री च्या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना मयूर सरकटे याने केली तसेच स्वामी विवेकानंद व माँ जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित माहिती तसेच त्यांच्या कार्याचा गौरव विद्यार्थिनी आपल्या भाषणांमधून केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेतील वर्ग तिसरीचे विद्यार्थी सुमेध बोन्डे, अथर्व कावरखे, यशश्री आटोळे, अनय भिंगे, गौरांगी तिवारी, सान्वी गावंडे, सावी सरनाईक, आरसलान शेख यांनी केले. तसेच स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा वेदांत शिंदे व समर्थ खंडेलवाल तर माँ जिजाऊ यांची वेशभूषा कार्तिकी वाघ हिने केली. यासोबतच शाळेचे प्राचार्य बस्वराज जगाये व शिक्षक सुशील गायकवाड यांची भाषणे संपन्न झाली.यावेळी शाळेतील विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment