येळकोट.... येळकोट ....जय मल्हारच्या जय घोषात श्री. क्षेत्र खंडोबारायाच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ.
येळकोट.... येळकोट ....जय मल्हारच्या जय घोषात श्री. क्षेत्र खंडोबारायाच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ.
------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
लोहा; प्रतिनिधी
अंबादास पवार
------------------------------
आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते श्री. क्षेत्र खंडोबारायाच्या पालखीचे पूजन
दक्षिण भारतात सुप्रसिद्ध श्री. क्षेत्र खंडोबा रायाच्या यात्रेला आज 10 जानेवारी रोजी भक्तीमय व उत्साहात प्रारंभ झाला असून काल बुधवारी शासकीय विश्रामगृह माळेगाव येथे लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते श्री .क्षेत्र खंडोबा रायाच्या मानाच्या पालखीचे पूजन करण्यात आले, यावेळी आमदार शिंदे यांनी श्री. क्षेत्र खंडेरायाच्या पालखीची पूजा करून मनोभावे दर्शन घेतले व यात्रेनिमित्त खंडेरायाच्या सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या, यावेळी नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा यात्रा सचिव मंजुषा कापसे, युवा नेते तथा कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रोहित पाटील शिंदे, माजी जि. प. सदस्य तथा लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रसेन पाटील गौडगावकर, खरेदी विक्री संघाचे सभापती स्वप्नील पाटील उमरेकर ,उपसभापती श्याम अण्णा पवार, कंधार बाजार समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अण्णाराव पवार, पशुसंवर्धन अधिकारी भूपेंद्र बोधनकर, तहसीलदार शंकर लाड, गटविकास अधिकारी डि.के,आडेराघो, लोह्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, माळाकोळीचे सहा.पोलीस निरीक्षक निलपत्रे, पुंडलिक पाटील बोरगावकर, सरपंच कमलबाई रुस्तमराव धुळगंडे, मोहन काका शूर ,सचिन कुदळकर ,समन्वय समिती सदस्य सिद्धू वडजे, संचालक सुधाकर सातपुते, शेकापचे तालुका अध्यक्ष नागेश हिलाल, सह सर्व विभागाचे विभाग प्रमुख, विस्तार अधिकारी, बांधकाम व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी, भाविक भक्त मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. यावेळी आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते श्री. क्षेत्र खंडेरायाच्या मानाच्या पालखीच्या मानकऱ्यांचा शाल, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. पालखी पूजनानंतर
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या महिला व बालकांसाठीच्या स्पर्धेचे उद्घाटनही आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी सर्व विभागाचे अधिकारी, पदाधिकारी, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी, महिला, बालक,भाविक भक्त, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment