कृषिदुतांकडून शेतकऱ्यांना कुक्कुटपालन लसीकरणाचे महत्त्व.
कृषिदुतांकडून शेतकऱ्यांना कुक्कुटपालन लसीकरणाचे महत्त्व.
-----------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
सांगवडे प्रतिनिधी
विजय कांबळे
-----------------------------------------------
सांगवडे प्रतिनिधी/- सांगवडे ता. करवीर येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्नित असलेल्या कृषी महाविद्यालय तळसंदे मधील ग्रामीण कृषि जागरूकता व कृषि औद्योगिक कर्यानुभव कार्यक्रम (RAWE & AIA) अंतर्गत कृषिदूतांनी पशु लसीकरन शिबिर आयोजित केले. या कार्यक्रमाअंतर्गत कृषिदुत अवधूत पवार, वेदांत पाटील, शुभम घाडगे, दर्शन परते, व्यकंटेश भोसले, अमित फडताळे,यासकडून सांगवडे
येथे कोंबड्यांचे लसीकरण शिबिर आयोजित केले.
यावेळी कुक्कुटपालन उद्योजक कुणाल पाटील यांचे मोठे सहकार्य लाभले. हे लसीकरन शिबिर विविध विषाणूजन्य रोगापासून पशुधनाची सुरक्षा होईल यासाठी आयोजित केले होते. यावेळी कृषिदुतांनी रानीखेत, मर, गुंजोरो, मेरेक्स, देवी या रोगाविषयी माहिती तसेच या रोगांना प्रतिकात्मक देण्यात येणा-या लासोटा, मॅरेक्स, गंबोरो या लसी, लस देण्याचे प्रमाण व पद्धती याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या शिबिरात मोठ्या संखेने शेतकरी व पोल्ट्री व्यवसायीक उपस्थित होते. या शिबिरा मार्फत एकूण 200 पक्षांचे लसीकरन यशस्वी रित्या पार पडले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रम अधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
Comments
Post a Comment