लोह्यात खा. चिखलीकर यांच्या नेतृत्वात शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा.

 लोह्यात खा. चिखलीकर यांच्या नेतृत्वात शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा.

----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

लोहा प्रतिनिधी

अंबादास पवार 

----------------------------

   छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तारखेनुसार शिवजयंती सोहळा नांदेड चे खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ढोल ताशा, टाळ मृदंग, आकर्षक आतिषबाजी सह शिवजयंती सोहळ्यात रंगात वाढली होती. शिवाजी महाराज की जय या गगनभेदी गर्जनानी अवघे शहर दुमदुमले होते. 

                शहरातील जुना लोहा भागातील छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यास नांदेड जिल्ह्याचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर व माजी जि. प. सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला. व खा. चिखलीकर यांच्या हस्ते रथातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करून शिवजयंती मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. सदरील मिरवणुकीत ढोल ताशा, आकर्षक आतिषबाजी, टाळ-मृदंगाचा गजर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची भव्य मिरवणूक शहराच्या मुख्य रस्त्याने काढण्यात आली. सदरील जयंती सोहळ्यात शहर व तालुक्यातील सर्व जातीधर्माचे नागरिक सहभागी झाले होते.

              शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शहरात भगव्या कमानी उभारण्यात येवून ध्वनिक्षेपकावरून शिवरायांचे स्पुर्ती गीते वाजविण्यात येत होती. लोहा शहर हे भगवेमय झाले होते. 

             मिरवणुकीत युवा नेते सचिन पाटील चिखलीकर, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य माणिकराव मुकदम, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, केशव मुकदम, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, माजी जि.प.सदस्य गणेश सावळे, माजी उपनगराध्यक्ष दता वाले, माजी नगरसेवक करीम शेख, बालाजी खिल्लारे, प्रा. डॉ. डी. एम. पवार, अंकुश पाटील कदम, नारायण येलरवाड, अप्पाराव पवार, बालाजी पाटील कदम, नरेंद्र गायकवाड, गणेश उबाळे, केरबा पाटील, विनायक काळे, माजी नगरसेवक भास्कर पवार, सचिन मुकदम, रथ सजावट करणारे अनिल धुतमल, दीपक कानवटे, सुरेश गायकवाड, माजी सरपंच संभाजी पवार, बंडू वडजे, पहेलवान मिरकुटे, प्रवीण धुतमल, नामदेव काका पवार, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष नारायण पाटील पवार, गोवर्धन पवार, केशव पवार, इमाम लदाफ, पैलवान गणेश कल्याणकर, अंबादास पाटील पवार सह बहुसंख्य शिवप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.