मंडलिक महाविद्यालयात खेळाडूंचा बक्षीस वितरण व सत्कार समारंभ संपन्न.
मंडलिक महाविद्यालयात खेळाडूंचा बक्षीस वितरण व सत्कार समारंभ संपन्न.
----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
----------------------------------
येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात विभागीय व आंतर विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे चॅम्पियनशिप मिळवलेल्या खेळाडूंचा तसेच राज्य, राष्ट्रीय स्तरावर कुस्ती स्पर्धेत यश संपादन केलेल्या पुरुष व महिला मल्लांचा सत्कार दादोबा मंडलिक सभागृहात नुकताच संपन्न झाला.
या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून
बिद्री साखरचे माजी संचालक बाजीराव गोधडे, माजी नगरसेवक सुहास खराडे तर प्रमुख अतिथी म्हणून शिवराज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य, व्हॉलीबॉल प्रशिक्षक महादेव कानकेकर, माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर,
एनआयएस कोच दादा लवटे , व्हॉलीबॉल प्रशिक्षक संभाजी मांगले उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांनी भूषविले .
खेळाडूंचा सत्कार प्रमुख पाहुणे व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन करण्यात आला. यामध्ये व्हॉलीबॉल संघातील खेळाडू गजानन गोधडे, विवेक चौगले, सत्यजित शिंदे, करण मांगले. सागर संकपाळ, विश्वजीत रामाणे,जीवन गोधडे, साहिल चौगले, पियुष साळोखे , अजय बोटे, निखिल सावंत, रवींद्र हळदकर यांचा समावेश होता.
तसेच कुस्ती स्पर्धेतील मल्ल अमृता पुजारी व नेहा चौगले ,विजय डोईफोडे व अस्मिता पाटील याचबरोबरच जुदो खेळाडू वैष्णवी कुशाप्पा
यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .
यावेळी महाविद्यालयाचा माजी खेळाडू श्रावण कळांद्रे याचाही कुशल संघटक म्हणून सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. प्रशांत कुचेकर, प्रा. अर्चना कांबळे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमात स्वागत व प्रास्ताविक संयोजक व जिमखाना प्रमुख, प्रा. डॉ. शिवाजी पोवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संजय हेरवाडे यांनी केले .तर आभार प्रा. डॉ. पी आर फराकटे यांनी मानले.
Comments
Post a Comment