जल जिवन पाणी पुरवठ्या’चा बट्याबोळ, भूजल सर्वेक्षण अभियंत्यानी पाणी असलेल्या जागी प्रमाणपत्र दिले. नंतर त्या ठिकाणी पाणी नाही म्हणून काम बंद पाडले, विहीरीला खोदकाम केल्यास पाणी लागते.
जल जिवन पाणी पुरवठ्या’चा बट्याबोळ, भूजल सर्वेक्षण अभियंत्यानी पाणी असलेल्या जागी प्रमाणपत्र दिले. नंतर त्या ठिकाणी पाणी नाही म्हणून काम बंद पाडले, विहीरीला खोदकाम केल्यास पाणी लागते.
------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
लोहा प्रतिनिधि
अंबादास पवार
------------------------------
सध्या केंद्रशासनाच्या वतीने व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने ग्रामीन भागातील जनतेला शुध्द व चांगले पाणी पिण्यासाठी मिळावे म्हणून हर घर जल जल जिवन मशीनच्या वतीने नांदेड जि. प. वतीने ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या देखरेखे खाली सदरील योजनेचे कामे चालू असून तर काही गावामध्ये टक्केवारीच्या वादात काम संत गतीने चालू असून त्या मध्ये उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, गुतेदार, सरपंच व ग्रामसेवक यांच्या संयुक्त वादामध्ये टक्केवारीच्या वादात लोहा तालुक्यातील किरोडा या गावी एक कोटी पन्नास लाख योजनेच्या जलजिवन योजनेचे कामे चालू आहेत. त्यामध्ये विशेष बाब अशी की या गावी पाणी पुरवठयाची विहीर खोदण्याासाठी जागा नव्हती ती जागा गावातील माजी सरपंच व काही समाजकार्यकर्त्यांनी विहीरी साठी जागा मिळवून दिली. त्या जागेची व विहिरीला पाणी लागतेकी नाही याची पाहणी स्वःता भूजल सर्वेक्षण विभागाचे अधिक-यांनी पाहणी करुन या ठिकाणी विहरिीला पाणी लागते म्हणून पाणी प्रमाणपत्र दिले व गुतेदाराने विहिर खोदण्याच्या कामास सुरुवात केली चाळीस फुटापर्यंत विहिर खोदले सध्या कडक अन्हाळा असल्यामुळे पाण्याची पातळी खाली जात आहे. पण गुतेदाराने व काही गावातील पाणी पिण्यास न मिळू देणारे काही महा भागांनी या ठिकाणी पाणी लागत नाही म्हणून गुतेदाराला सांगुन व पुन्हा भुलजच्या अधिका-यांना बोलावून या ठिकाणी पाणी लागत नाही म्हणून कामाचा खोळंबा केला. भुजल वाल्यांना असे समजले नाही की या ठिकाणी उभा बोर व साठ फुटापर्यंत खोदल्यास बोर घेतल्यास पाणी लागते पण काही लोकांचे ऐकून भुजल वाल्यांनी तळयामध्ये आयती जूनी विहिर आहे. तेथे पाणी लागते असे सांगितल्यामुळे अखेर घाण पाणी पिण्याची वेळ जनतेवर येणार आहे. भुजल खात्याच्या अधिका-याच्या सांगण्यावरुन ही नळ योजनेच्या विहिरीचे काम अर्धवट आहे. त्यामुळे गावक-यांमध्ये तिव्र संतापाची लाट पसरली आहे. विहिरच खोदली नाही. गावामध्ये चांगले रस्ते खोदुन पाणी पुरवठयाची पाईपलाइन खोदली आहे. पण विहिरीतच नाही तर पोह-यात कसे येणार या मुळे जनते मध्ये संताप आहे. म्हणून पाणी लागत नाही पाणी लागत नाही चांगल्या कामाची बदनामी होत आहे. तर विहिरीला जागा देऊन दान देणारे यांचा सन्मान करण्याऐवजी ग्रामपंचायत विहिरीला पाणी लागत नाही म्हणून जनतेची दिशाभुल करीत आहेत. तळयामध्ये टाकी बांधून घान पाणी पाजीण्याचा हा डाव असून जून्याटाकीपासून घाण पाण्याचा नाला वाहतो त्याचेच पाणी टाकीत जाते व जनतेला पिण्यास भाग पाडले जाते. म्हणून या गंभीर बाबीकडे पाणीपुरवठा विभाग्याच्या अधिका-यांनी लक्ष दयावे अशी गावक-यांची मागणी आहे.
Comments
Post a Comment