बी आर एस (भारत राष्ट्र समिती ) पक्षाचा महाराष्ट्रात कोणत्या पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देणार.

 बी आर एस (भारत राष्ट्र समिती ) पक्षाचा महाराष्ट्रात कोणत्या पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देणार.

-------------------------------------

 फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र.

अमरावती जिल्हा प्रतिनिधी.

पी एन देशमुख.

-------------------------------------

लोकसभा निवडणूक मध्ये पक्षांतरीत उमेदवार निवडणूक लढविण्यास मैदानात उतरलेल्या असून, परंतु महाराष्ट्रात शहरी ग्रामीण भागात ग्रामीण भागात पक्षाचे शाखा जाळे पसरलेले असलेले पक्षाची मजबूत बांधणी केल्या गेल्याचे समजते.बी .आर .एस. भारत राष्ट्र समिती पक्ष , मान्यताप्राप्त पक्षांचेउमेदवार तसेचअपक्ष उमेदवार निवडणुकीत ठाकले असुन सर्व उमेदवारांचे व मतदारांचे लक्ष पाठिंबा बाबत भारत राष्ट्र समिती पक्षाकडे मतदारांचे लक्ष लागलेआहे. अधिकृत पक्ष्यांना व अपक्ष उमेदवारांना आनेक संघटनेने तसेच लहान मोठे पक्ष्यांना काही उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे. परंतु विदर्भात जिल्हास्तरीवर बीआरएस (तेलंगणा) भारत राष्ट्र समिती पक्षाचा कोणत्या उमेदवाराला पाठिंबा दिला जाईल, याकडे मतदारांचे जनतेचे लक्ष लागलेले आहे. महाराष्ट्रात नवीनच बी आर एस पक्षाने शहरात व ग्रामीण भागात पक्षाची मोठ्या प्रमाणात बांधणी केलेली आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत या पक्षाचे महाराष्ट्रात उमेदवार निवडणुकीत उतरलेला नाही. परंतु त्यांचा पाठिंबा व सहभाग कोण्या पक्षाला किंवा अपक्षाला किंवा व्यक्तीला पाठिंबा देण्याची त्यांची मनसुबा आहे. परंतु अद्यापही गोपनीय पत्ते उघडलेले नाही. आमच्या प्रतिनिधींनीने बी .आर .एस. पक्षाचा मागावा घेतला असता, असे समजले की बी आर एस पक्षाचे प्रमुख (तेलंगणा) माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर रेड्डी यांनी अद्यापही कुठल्या व्यक्तीला किंवा पक्षाला पाठिंबा देण्याचे आदेश दिलेले नसल्याचे समजले असुन, पश्चिम विदर्भ समन्वयक निखिल देशमुख अमरावती यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अद्यापही पाठिंबा बाबत गुढ कायम ठेवला असून वेळेवर आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत तसेच मजुरांच्या, कामगारांचे प्रश्न हाताळणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत विचार करणार आहोत. अनेक पक्षाचे पदाधिकारी तसेच अपक्ष उमेदवार पण माझ्या संपर्कात आले आहे. ह्याबाबत मी पश्चिम विदर्भ समन्वयक असल्यामुळे माझ्याकडे अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा, बुलढाणा जिल्हा असल्यामुळे माझ्या बी आर एस भारत राष्ट्र समिती पक्षाच्या बैठका सुरू आहे. व प्रत्येक जिल्ह्याच्या समन्वयक तसेच बि.आर.एस. संघटनेचे पदाधिकारी व तमाम सदस्य यांच्या बैठका सुरू आहे चर्चा चालू आहे. परंतु अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. पाठिंबा बाबत पुढील निर्णय एक-दोन दिवसात जिल्हास्तरीय निर्णय घेऊन जाहीर करू ते असे पश्चिम विदर्भ भारत राष्ट्र समितीचे समन्वयक निखिल देशमुख अमरावती यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.