डॉक्टर बाफना स्टार सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये झालेल्या चोरीचा गुन्हा चोवीस तासात उघड.
डॉक्टर बाफना स्टार सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये झालेल्या चोरीचा गुन्हा चोवीस तासात उघड.
-----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
-----------------------------
रुक्मिणी नगर कोल्हापूर येथे असलेल्या डॉक्टर बाफना स्टार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये असलेल्या कॅश काँटरचे ड्रॉवर उघडून 1,85, 950 रुपये रोख रक्कम चोरी करून नेल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यास दाखल करण्यात आली होती .
या चोरीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या स्टाफ यांची गोपनीय माहिती मिळवून तांत्रिकदृष्ट्या तपास करत असताना गोपनीय बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की डॉक्टर बाफना स्टार सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये सध्या ड्रायव्हर म्हणून काम करणारा अमित फराकटे व व 42. राहणार गगनगिरी सोसायटी भोसलेवाडी कोल्हापूर व यापूर्वीचा ड्रायव्हर अमोल जाधव व व,33 राहणार चव्हाण गल्ली भोसलेवाडी या या दोघांनी हॉस्पिटलमध्ये चोरी करून दोघे चोरी केलेल्या रोख रकमेसह ते दोघे टेंबलाई वाडी रेल्वे फाटक येथील उड्डाणपूलाच्या खाली येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून चोरट्यांच्या मुस्क्या आवळून त्यांच्या ताब्यातील रोख एक लाख साठ हजार रुपये एक बजाज प्लेटिना मोटरसायकल दोन मोबाईल हँडसेट असा दोन लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या चोरीचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या चोरीचा तपास 24 तासात लावला
Comments
Post a Comment