मुरगूडच्या " श्री व्यापारी नागरी पतसंस्थेला '' ५७ लाख१९ हजाराचा नफा.

 मुरगूडच्या " श्री व्यापारी नागरी पतसंस्थेला '' ५७ लाख१९ हजाराचा नफा.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मुरगूड प्रतिनिधी

जोतीराम कुंभार

---------------------------------

         येथील श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेला २o२३-२४या आर्थिक वर्षात ५७ लाख१९ हजार इतका ढोबळ नफा झाला असून १८ कोटी

८८ लाख ठेवी आहेत तर ४० लाख६३ हजार चालू वर्षी तरतूद केली आहे .सुरक्षित गुंतवणूक ६ कोटी६७ लाख केली आहे . कर्ज वितरण १४ कोटी४२ लाख केले आहे . अशी माहिती संस्थेचे चेअरमन श्री . किरण गवाणकर यानीं बोलताना दिली .

गवाणकर पुढे म्हणाले वसुल भागभांडवल ३६ लाख३६हजार , राखीव व इतर निधी९१ लाख९६ हजार , रोख व बँक शिल्लक २९ लाख३० हजार , मालमत्ता ४१ लाख४७ हजार , इतर येणी २५ लाख८६ हजार, शिल्लक स्टेशनरी २ लाख७ हजार , व खेळते भांडवल२२ कोटी३६लाख आणि उलाढाल ११९ कोटी२० लाख इतकी आहे .थकबाकी० .५२टक्के आहे . तर सी .डी. रेशो ६६ .१९टक्के इतका आहे .

     रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या श्री .व्यापारी नागरी पतसंस्थेस कर्जदारानीं वेळेत कर्जाची परतफेड करुन सहकार्य केले आहे . सभासदांच्या विश्वासास पात्र राहून संचालक मंडळ कार्यरत आहे . नोकर वर्गाचेही आपुलकीने व तप्तर सेवा देण्याचे कार्य सुरु आहे . त्यामुळेच श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था यशस्वीपणे रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करत आहे .

यावेळी संस्थेचे व्हा . चेअरमन प्रकाश सणगर , संचालक प्रशांत शहा , किशोर पोतदार , साताप्पा पाटील , शशिकांत दरेकर , नामदेवराव पाटील , हाजी धोंडीराम मकानदार , निवास कदम , प्रदिप वेसणेकर , संदिप कांबळे , संचालिका सौ . सुनंदा जाधव , सौ . रोहिणी तांबट , कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर , संस्थेचा कर्मचारीवर्ग उपस्थित होता .

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.