वाहतूकीचे नियम न पाळल्यामुळे अपघातात वाढ. वैभव कांबळे.
वाहतूकीचे नियम न पाळल्यामुळे अपघातात वाढ. वैभव कांबळे.
मेढा, ता:१:सध्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाहतुकीचे नियम न पाळता वाहने बेदरकारपणे चालवली जातात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. महाबळेश्वर आगारातील चालक वसंत मारुती शेलार यांनी सलग २८वर्षे विनाअपघात सुरक्षित सेवा देऊन एक आदर्श निर्माण केला आहे. श्री.शेलार यांचा आदर्श घेऊन आगारातील चालकांनी घेऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी दक्ष राहावे, असे आवाहन महाबळेश्वर आगाराचे आगार व्यवस्थापक वैभव कांबळे यांनी केले.
महाबळेश्वर आगारातील चालक वसंत मारुती शेलार हे आपल्या २९वर्षांच्या राज्य परिवहन सेवेतून नुकतेच सेवानिवृत्त झाले त्यावेळी आगारातील चालक -वाहक विश्रांतीगृहात आयोजित कार्यक्रमात कांबळे बोलत होते. यावेळी सहायक कार्यशाळा अधिक्षक सुजित घोरपडे, स्थानक प्रमुख शाहरुख खान, सहायक वाहतूक निरीक्षक किरण धुमाळ,वाहतूक नियंत्रक प्रदीप बाबर, संतोष शिंदे, अजित जमदाडे, विठ्ठल चव्हाण, लखन वायदंडे, सारंग दळवी, यशवंत लोखंडे, महेंद्र खेचरे, लक्ष्मण शेलार, सुशांत शेलार, विशाल शेलार आदींची उपस्थिती होती.
प्रारंभी आगार प्रशासनाच्या वतीने आगार व्यवस्थापक कांबळे यांच्या हस्ते श्री. शेलार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या वतीने भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाहरुख खान,विठ्ठल चव्हाण, महेंद्र खेचरे, सुशांत शेलार, विशाल शेलार यांनी मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना श्री. शेलार यांनी सेवेदरम्यान साथ देणाऱ्या अधिकारी,कामगारांचे आभार मानले.या कार्यक्रमास चालक-वाहक,कार्यशाळा कर्मचारी उपस्थित होते.विठ्ठल चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.शाहरुख खान यांनी आभार मानले.
महाबळेश्वर:वसंत शेलार यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करताना वैभव कांबळे., समवेत सुजित घोरपडे, शाहरुख खान आदी.
Comments
Post a Comment