ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे एका कॉल वर होणार गाव अलर्ट - आजवर 65 लाख लोक या यंत्रणेशी जोडलेची माहिती- डी सी गोरडे.

 ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे एका कॉल वर होणार गाव अलर्ट - आजवर 65 लाख लोक या यंत्रणेशी जोडलेची माहिती- डी सी गोरडे.

--------------------------------------- 

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

शिरोलि प्रतिनिधी

अमित खांडेकर 

-----------------------------------------


कोल्हापूर जिल्हा पोलीस दल व जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली शिरोली MIDC पो. ठाणे व अंतर्गत येणारे सर्व ग्रामपंचायतीचा संयुक्त उपक्रम सरपंच सर्व सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व गावात *ग्राम सुरक्षा यंत्रणा* कार्यान्वित करण्यासाठी शुक्रवार दि.12 जुलै रोजी रुक्मिणी हॉल,पुणे बेंगलोर हायवे,सांगली फाटा ,शिरोली पुलाची येथे कार्यक्रम संपन्न झाला.

       या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी डी. के.गोरडे ,संचालक ग्रामसुरक्षा यंत्रणा,नाशिक हे उपस्थित होते. त्यानी उपस्थित लोकांना एखादा प्रसंग उदभवल्यानंतर किंवा एक एखादी आपत्ती आल्यानंतर एकावेळी ,कमी कालावधीत हजारो लोकांपर्यंत संदेश तात्काळ कसा पोहोच करायचा याचे प्रात्यक्षिक व माहिती सादर केली.चोरी, दरोडा,महिलांसंदर्भात गुन्हे,लहान मुले हरविणे, वाहन चोरी,गंभीर अपघात,वन्य प्राण्यांचा हल्ला, आगीच्या घटना यासारख्या अनेक घटनांमध्ये तातडीने मदत मिळणेसाठी व अशा घटनांना आळा घालणेसाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित असणे गरजेचे आहे.

आपत्कालीन परिस्थितीत, संकटकाळात सर्व गावकऱ्यांना एकाच वेळी सूचना देणे, सावध करणे, मदत करणे यासाठीही ग्रामसुरक्षा यंत्रणा असणे गरजेचे आहे. पंतप्रधानाच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये ही ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित असल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित सर्व गावांनी ही यंत्रणा उभी करण्याचे आव्हाहन त्यांनी यावेळी केले.संपूर्ण देशामध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणेचा 1800 270 3600 हा टोल फ्री क्रमांक असल्याचे सांगितले.यावेळी शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती.याचबरोबर शिरोली एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीतील शिरोली, हालोंडी,नागाव,मौजे वडगाव,टोप, संभापूर, कासारवाडी, शिये,भुये,जठारवाडी,सादळे, मादळे गावातील सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,पोलीसपाटील,पत्रकार बांधव, प्रतिष्ठित पदाधिकारी, नागरिक, आजी माजी,जिल्हा परिषद सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल तंटामुक्त अध्यक्ष, शांतता कमिटी, पोलीस मित्र ,शाळा, कॉलेज, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, राशन दुकानदार, मेन रोड वरील हॉटेल व्यावसायिक, व्यापारी, बँक ,सोसायटी ,संचालक, कर्मचारी तसेच गावातील सामाजिक तरुण मंडळे, सुज्ञ नागरिक हे मोठया संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.