शेतकऱ्याचा मुलगा बनला सशस्त्र सेनादलाचा अधिकारी ..केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत चुयेच्या सौरभ पाटील चे नेत्रदिपक यश :देशात 68 व्या रँकने उतिर्ण .
शेतकऱ्याचा मुलगा बनला सशस्त्र सेनादलाचा अधिकारी ..केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत चुयेच्या सौरभ पाटील चे नेत्रदिपक यश :देशात 68 व्या रँकने उतिर्ण .
----------------------------------
हातकणंगले प्रतिनिधी
विनोद शिंगे
----------------------------------
प्रचंड महत्त्वकांक्षा जिद्द चिकाटी आणि प्रयत्नांची पराकाष्टा या सर्व गुणांना आत्मसात करत मी जिंकणारच ध्येयाने प्रेरित झालेल्या आणि सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या चुये तालुका करवीर येथील सौरभ रामचंद्र पाटील याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 68 वा क्रमांक मिळवीत भारतीय सशस्त्र सेना दलात वर्ग एक चा अधिकारी होण्याचा मान मिळवलेला आहे . . . प्रतिकुल आर्थिक परिस्थितीत सकारात्मक ध्येयाने कष्ट घेऊन यूपीएससी सारख्या खडतर परीक्षेत यश मिळवून सौरभने जिल्ह्यातील युवकांच्या पुढे एक आदर्श निर्माण केलेला आहे .
वडील रामचंद्र पाटील हे कष्टकरी सामान्य शेतकरी व आई आशा सेविका असे सौरभचे कुटूंब . . सेंद्रिय शेतीवर निषीम प्रेम करणारा आणि इतरांसाठी प्रबोधन करणारा रामचंद्र पाटील यांची ओळख . . . .सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून मिळणारे तोकडं उत्पन्न एवढाच त्यांचा आर्थिक आधार .मात्र मुलांनी उच्च शिक्षण घेऊन कर्तृत्वान बनावे ही त्यांची अविरत इच्छा . त्यामुळेच त्यांनी आपल्या तिन्ही मुलांसाठी प्रचंड कष्ट करीत दिशा देण्याचा कायम प्रयत्न केला . त्यामुळेच त्यांच्या या कष्टाला सौरभच्या रूपाने नेत्र दीपक यश मिळालं आणि भारताच्या सशस्त्र दलात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून सौरभ रामचंद्र पाटील हा क्लासवन अधिकारी बनला आणि खऱ्या अर्थाने रामचंद्र पाटील यांचे स्वप्न साकार झाले . सौरभने आपल्या कुटुंबाबरोबरच चुये गावाचे नाव देशभर पोहचविले आहे
सौरभ चे प्राथमिक शिक्षण गावातीलच प्राथमिक शाळेत झाले .त्यानंतर नवोदय साठी त्याने पी आर . कांबळे या शिक्षकांच्या मार्गदर्शना खाली निवासी मार्गदर्शन घेऊन नवोदयची परिक्षा दिली त्यामध्ये तो यशस्वी होऊन नवोदयसाठी निवडला गेला . यामुळे तो गावातील पहिला नवोदय साठी निवड झालेला मुलगा ठरला . नवोदय विद्यालयातच त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले . .बारावीला असतानाच मला भारताच्या संरक्षण दलात अधिकारी व्हायचंय हे त्याने स्वप्न उराशी बाळगलं होतं त्यामुळे एनडीएच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात तो पास झाला . मात्र तांत्रिकअडचणीमुळे त्याची एन डी ए ची संधी गेली .. यश मिळाले नाही म्हणून तो खचला नाही . नव्या उमेदीने त्यांने आपला शैक्षणिक प्रवास पुढे सुरू ठेवत त्याने सिहंगड इन्स्ट्युट मध्ये बी .टेक .ची पदवी मिळविली .स्पर्धा परीक्षा हे त्याचं ध्येय निश्चित होतं .त्यामुळे त्याने राज्य लोकसेवा आयोगातून ग्रामीण कृषी बँकेत सहाय्यक व्यवस्थापक पदावर संधी मिळवली .परभणी येथे बँकेत सेवा बजावली .नोकरी करत असताना त्याचं सेनादलातील नोकरीचे स्वप्न अपूर्ण होतं .त्यामुळे तो सतत परीक्षा देत होता त्यातून त्याची भारतीय गृह मंत्रालयात गुप्तहेर खात्यात एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून निवड झाली त्या ठिकाणी त्याने काही वर्ष नोकरी केली . त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली . .या परीक्षेत त्याने देशात 68 ची रँक मिळविली . वैशिष्ट म्हणजे त्यांने कोणताच क्लास न लावता स्वयंअध्ययन केले . त्याची भारतीय सशस्त्र सेनादलात कमांडिंग ऑफिसर म्हणून निवड झाली आहे . सौरभच्या नेत्रदिपक कामगिरी बदल त्याची ग्रामस्थांनी मिरवणूक काढून सर्वानी अभिनंदनाचा वर्षाव केला .
प्रसंगी जमिन विकेन मात्र तुला अधिकारी करणारच .
सौरभ ची बुद्धिमत्ता आणि प्रयत्नांची पराकष्ट हे गुण ओळखून त्याच्या वडिलांनी प्रतिकूल परिस्थिती शी खंबिर तोंड देत सौरभला पाठबळ दिले . सौरभ खुप शिकायचे . कोणतेही संकट येऊ दे मी घाबरणार नाही तुझ्या शिक्षणासाठी प्रसंगी जमिन विकेन मात्र तुला अधिकारी करणारच ही जिद्द त्याच्या वडिलांची होती .त्याप्रमाणेच वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत सौरभने अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केलं .आणि वडिलांच्या कष्टाला खऱ्या अर्थाने सलाम केला .
तिन्ही मुले यशस्वी ठरली . .
रामचंद्र यांच्या पाठबळामुळे सौरभ क्लास वन अधिकारी तर कन्या वृषाली एम . टेक . व लहान मुलगा संकेत एम .ए . (स्पर्धा परिक्षा तयारी सुरू ) त्यामुळे तिन्ही मुले उच्चशिक्षीत होऊन यशस्वी ठरली आहेत.युवकांना सर्वतोरुपरी मार्गदर्शन करणार .
अभ्यासात सातत्य आणि कष्ट करण्याची जिद्द असेल तर कोणती गोष्ट अशक्य नसते हा विचार सोबत घेऊनच मी नियमित अभ्यास केला .अपयशाने खचलो नाही पुन्हा नव्या उमेदीने स्पर्धा परीक्षेची तयारी केली म्हणूनच मला हे यश प्राप्त झालेले आहे
स्पर्धा परीक्षेबाबत अनेक युवकांना सखोल माहिती नसते त्यामुळे त्यांना निश्चित दिशा मिळत नाही .स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांसाठी मार्गदर्शन करून माझ्यासारखे अनेक अधिकारी घडावेत या हेतून सहकार्य करणार असण्याची ग्वाही सौरभ पाटील बोलताना दिली .
Comments
Post a Comment