राधानगरी धरण भरण्यास , पाच फूट कमी असून धरण , 90.5 टक्के% भरले तर आज मंगळवार पाऊस कमी.

 राधानगरी धरण भरण्यास , पाच फूट कमी असून धरण , 90.5 टक्के% भरले तर आज मंगळवार पाऊस कमी.

-----------------------------------

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

-----------------------------------

राधानगरी धरण परिसरात आज मंगळवारी दिवसभर पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याने राधानगरी धरण भरण्यास पाच फूट कमी असून धरण 90.5% भरले तर राधानगरी धरण गुरुवारपर्यंत खुले होण्याची शक्यता असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली


याबाबत अधिक माहिती अशी की राधानगरी धरण परिसरात आज मंगळवारी पावसाचे प्रमाण कमी झाला असल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने धरणाची पाण्याची पातळी 342.90 फुट पाणीसाठा 7504.48 दशलक्ष घनफूट असून धरण 90.05 % भरले आहे तर आज सकाळी सहा पर्यंतचा पाऊस 137 मिलिमीटर तर आज सायंकाळी चार वाजे पर्यंतचा ४९ मिलिमीटर व एक जून ते 23 जुलै अखेर 26 03 मिलीमीटर झाला आहे तर विद्युत गृह पंधराशे कयुसेक्सपाणी सोडण्यात आले आहे राधानगरी धरण भरण्यास पाच फूट कमी तर गुरुवार पर्यंत धरण खुले होणार असल्याची शक्यता भोगावती पाटबंधारे खात्याकडून वर्तवण्यात येत असून नाल्यांमधून येणारे पाणी नदीच्या पात्रामध्ये जाऊन पाण्याची झपाट्याने वाढ होत असल्याने, नदीकडच्या शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असे आव्हान पाटबंधारे खात्याकडून करण्यात येत आहे

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.