राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्व महापालिकेचे आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, व इतर यंत्रणेला सतर्क राहण्याचे काढले आदेश.
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्व महापालिकेचे आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, व इतर यंत्रणेला सतर्क राहण्याचे काढले आदेश.
-----------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
-----------------------------------------
मुंबई: महाराष्ट्र राज्यातील बहुतांश भागात सुरू असलेल्या धुवाधार पावसाने सर्वत्र एकच दाणादाण उडविले आहे.
काही भागात दृष्टी सदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून ग्रामीण भागासह शहरातील अनेक रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झालं आहे.
दरम्यान, हवामान विभागांना (I.M.D) दिलेल्या अंदाजानुसार, राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा तिसरा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
तर या पावसाचा सर्वाधिक जोर हा मुंबई, मुंबई उपनगर, कोकण सह विदर्भात बघायला मिळाला असून मुसळधार पावसाचा फटका स्थानिक नागरिकांसह शेतकऱ्यांना देखील बसला आहे.
याचा अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, राज्यातील सर्व महापालिका आयुक्त आणि आपत्कालीन यंत्रणेच्या प्रमुखांशी चर्चा करून सर्व यंत्रणा सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर मुंबई सह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
त्याचबरोबर इतरही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
त्याच पार्श्वभूमीवर एस .डी .आर. एफ, जिल्हा प्रशासन, पोलीस , महापालिका, नगरपालिका, आदी विविध स्थानिक स्वराज्य संस्था यांनी पत्रकार रहावे आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी,
अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत..
Comments
Post a Comment