सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करुन बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या बांधकाम धारकावर महानगर पालिकेची कारवाई.

 सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करुन बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या बांधकाम धारकावर महानगर पालिकेची कारवाई.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार.

-------------------------------

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रमुख जिल्हा महामार्ग 20 या रोडच्या दुतर्फा जैसे थे बांधकाम ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केलेले आहेत. 

परंतु काही गुंड प्रवृत्तीचे लोक बेकादेशीर बांधकाम पूर्ण करत.

प्रसिद्ध माध्यमाच्या पत्रकारांना धमक्या देऊन बातम्या देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला.. कोल्हापूर महानगरपालिका व उचगाव ग्रामपंचायत यांचा हद्दीचा वाद सर्वोच्च न्यायालयात दिल्ली येथे प्रलंबित असताना तसेच न्याय प्रक्रियेमधील सन्माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी दिनांक 3/5/2018 SLP no 10001/2018 रोजी जैसे थे परस्थिती ठेवून त्या वेळेला झालेली बेकादेशीर बांधकामाचे फोटो ग्राफ व पंचनामा शूटिंग करून ठेवण्याचे आदेश पारित केलेले होते असे असताना सन्माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत विनापरवाना बेकायदेशीर बांधकाम बाळासाहेब रामचंद्र मन्नाडे यांनी उंचगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील गावामध्ये सुरू केलेले आहे त्याबाबत अनेक कार्यकर्त्यांसह माजी नगरसेवक अनिल कदम अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी  या बेकायदेशीर बांधकामाबाबत तक्रार दाखल करुन मा कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेतली होती आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मा आयुक्त यांनी चौकशी करण्यात यावी व जर सर्वोच्च न्यायालयाचा आदेशाचा भंग होत असेल तर कारवाई करण्याचे आदेश दिले होते 

कोल्हापूर महानगरपालिका त्याची दखल घेत आज रोजी 53/1 प्रमाणे सहाय्यक संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका  कर्मचाऱ्यांनी गट नंबर 96/4/अ/2  मध्ये पंचनामा करून सदर बेकायदेशीर बांधकाम धारकाला नोटीस बजावून बांधकाम थांबविण्या बाबत नोटीस लागू केलेली आहे तसेच इतर भागात काही बांधकाम झाली असल्यास त्याची शहानिशा चौकशी संबंधित अधिकारी करत आहेत तसे बेकादेशीर बांधकाम आढळल्यास त्यावर कठोरात कठोर कारवाईचे करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलेले आहे

Comments

Popular posts from this blog

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.