स्वामी विवेकानंद विद्यालय व्याड येथे वृक्षारोपण.
स्वामी विवेकानंद विद्यालय व्याड येथे वृक्षारोपण.
------------------------------------
रिसोड/प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
------------------------------------
तालुक्यातील स्वामी विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व्याड येथे 12 जुलैला जपूया पर्यावरण, करूया वृक्षारोपण या उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने व प्रवीण सरनाईक शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली व जेष्ठ शिक्षक एन पी वाघ, जे. पी भिसडे, रवि अंभोरे, डी ए मांडे यांच्या हस्ते पन्नास पर्यावरण पूरक वृक्षाची लागवड विद्यालयाच्या परिसरात करण्यात आली. दरवर्षी वाढत चाललेले तापमान भविष्यातील पिढी साठी धोक्याची घंटा आहे. वेळीच यावर उपाय करने हाच सर्वोत्तम पर्याय आहे यासाठी जिथे जागा असेल तिथे झाडं लावणे ही काळाची गरज आहे.वृक्षारोपणच नव्हे तर लावलेली वृक्ष जगली पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर पर्यावरण सरांक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी हा उपक्रम रबविण्यात आला.वृक्षलागवड उपक्रमात वर्ग 9 विच्या विद्यार्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित यावर्षी किमान शंभर झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक एस डी जाधव सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य मिळाले.
Comments
Post a Comment