बस्तवडे ता.कागल येथे गाव चावडीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थी वाचन कार्यक्रम संपन्न.
बस्तवडे ता.कागल येथे गाव चावडीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थी वाचन कार्यक्रम संपन्न.
-----------------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
-----------------------------------
बस्तवडे ता.कागल येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत गाव चावडी वाचन कार्यक्रम करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सुनीता गंगाधर शिंत्रे या होत्या. तर उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक गावचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते साताप्पा कांबळे यांनी या योजनेच्या माहितीचा सविस्तर आढावा घेतला व अजून काही पात्र लाभार्थी शिल्लक राहिले असेल तर लवकरात लवकर या योजनेचा फॉर्म भरून लाभ घ्यावा तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री व वयश्री योजनेबद्दल थोडक्यात माहिती दिली व मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना लाभार्थी याचा सुद्धा सर्व तरुणांनी लाभ घ्यावा. असे आव्हान करण्यात आले या कार्यक्रमाविषयी गावच्या ग्रामसेवीका व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ग्राम स्तरीय योजना समिती संयोजक सुविधा पाडलेकर मॅडम यांनी आतापर्यंत ऑनलाइन पात्र लाभार्थी यांची माहिती वाचून दाखवली व या योजनेची सविस्तर थोडक्यात माहिती दिली. व योजनेसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले . या कार्यक्रमाप्रसंगी गावातील अंगणवाडी सेविका वर्षा पाटील व शिल्पा कुंभार यांनी गावांमध्ये बचत गटाच्या सी.आर.पी.
यांच्यावतीने अतिशय चांगले काम केले याबद्दल अंगणवाडी सेविका व बचत गट सी.आर.पी. व शासकीय अधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती गावचे डे.सरपंच प्रवीण पाटील, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अधिकारी मंजुषा सदलगे मॅडम, अशा स्वयंसेविका सुनीता कांबळे, गंगाधर शिंत्रे, दाजीबा पाटील, संतोष पाटील, विजय यादव, बजरंग पाटील, युवराज देसाई, नामदेव वांगळे, सुभाष पाटील, सतीश नरके, शरद भोसले, साताप्पा नरके, व पूजा कांबळे इत्यादी हजर होते,शेवटी शरद नरके यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment