पुईखडी येथे रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.तर नंदवाळ मध्ये वैष्णवाची मादीयाळी.

 पुईखडी येथे रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.तर नंदवाळ मध्ये वैष्णवाची मादीयाळी.

------------------------------------

करवीर प्रतिनिधी 

मयुरेश कुंभार 

------------------------------------

कोल्हापूर येथील पुईखडी  येथे आषाढी एकादशी निमित्त रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

या आषाढी एकादशी निमित्त विविध गावातून पालखी वाजत गाजत  प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ कडे रवाना होताना दिसत होत्या नंदवाळ येथील  विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर येथे जाणाऱ्या पालख्या पुईखडी येथे  मानाची पालखीचे  पूजन नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर व पत्नी यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी अश्वमेघ याचे पूजन नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर व खासदार शाहू महाराज आमदार ऋतुराज पाटील मा.जि प सदस्य राहुल पाटील माजी पोलीस अधिकारी आर आर पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले त्यानंतर रिंगण सोहळा मध्ये अश्वमेघ रिंगण सोहळा पार पडला. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक भक्तमंडळी हा सोहळा पाहण्यासाठी आले होते  गावा गावात पालखी रोडवर राजगिरे लाडूशाबू खिचडी तसेच  दूध  प्रसाद वाटप करण्यात आले.

या सोहळ्यामध्ये नंदवाळ प्रती पंढरपूर या विठ्ठल रखुमाई मंदिराला नियोजन मंडळाच्या अध्यक्ष राजे क्षिरसागर यांनी चांदीची पालखी व पांडुरंगाची मूर्ती भेट म्हणून दिली यावेळी अनेक कोल्हापूर जिल्ह्यातून आलेले वैष्णव उपस्थित होते.

कोल्हापूर राधानगरी फोंडामार्ग हा विठ्ठल भक्तांनी गजबजून गेला होता.

लाखो भक्तांनी विठ्ठल रुक्माई दर्शनाचा लाभ घेतला करवीर चे उपविभागीय अधिकारी सुजित कुमार क्षिरसागर यांनी नंदवाळ येथील विठ्ठल मंदिराच्या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. वैष्णवांना सुरक्षितता  पोहोचवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज होते. त्यामुळे हा वैष्णवी मेळा संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात ऐतिहासिक ठरला.

Comments

Popular posts from this blog

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.